‘बाबा, मला आत्ताच घ्यायला या..!’
By Admin | Updated: October 5, 2014 22:56 IST2014-10-05T22:56:45+5:302014-10-05T22:56:45+5:30
‘बाबा..मला आत्ताच घ्यायला या, माझ्या जीवाला धोका आहे..’ २२ सप्टेंबरला उशिरा रात्री, मृत रूपालीने थूगाव पिंप्री येथे वडिलांना फोन करून स्वत:च्या स्थितीची कळकळीने कल्पना दिली होती. सासरी

‘बाबा, मला आत्ताच घ्यायला या..!’
रूपालीचा फोन : सासरच्यांविरूध्द गुन्हा
अमरावती : ‘बाबा..मला आत्ताच घ्यायला या, माझ्या जीवाला धोका आहे..’ २२ सप्टेंबरला उशिरा रात्री, मृत रूपालीने थूगाव पिंप्री येथे वडिलांना फोन करून स्वत:च्या स्थितीची कळकळीने कल्पना दिली होती. सासरी नांदण्याची रूपालीची अजिबात तयारी नव्हती. परंतु सासरच्या मंडळींनी दिलेल्या आश्वासनानंतर रूपालीची समजूत घालून इतर पालकांप्रमाणे रूपालीचे पालकही परतले. हीच त्यांची चूक ठरली. शेवटी, शारीरिक आणि मानसिक यातनांना कंटाळलेल्या रूपालीचा तिच्या सासरच्यांनी काटा काढलाच!
‘लोकमत’च्या ५ आॅक्टोबरच्या अंकात ‘विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील रूपाली तुरखडे हत्येप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल केला. घटनेच्या चार दिवसांनी रूपाली तुरखडे हत्येप्रकरणी ठाणेदारांनी भादंविच्या कलम ४९८(अ),३०६, ३०४ (ब) नुसार गुन्हे नोंदवून या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील थूगाव पिंप्री येथील लंगोटे कुटुंबातील लाडकी लेक रूपालीचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील सतीश तुरखडे याचेशी झाला.
लग्नात लंगोटे कुटुंबाने सतीशला दीड लाख रूपये हुंडा दिला होता. परंतु अवघ्या सहा महिन्यांतच रूपालीचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. रूपालीच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, हौसमौज रूपालीच्या वाट्याला आलीच नाही.
ठाणेदाराची भूमिका संशयास्पद
२ आॅक्टोेबरला घरून बेपत्ता झालेल्या रूपालीचा मृतदेह घरापासून अवघ्या १ हजार मी. अंतरावरील अरूंद विहिरीत सापडल्यानंतर लंगोटे कुटुंबाने अंजनगाव पोलीस ठाण्यात रूपालीच्या सासरच्या मंडळींविरूध्द तक्रार दिली. परंतु येथील ठाणेदार गजानन पडघम यांनी तब्बल ४ दिवसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा तर ठाणेदारांचा प्रयत्न नव्हता? यातून ठाणेदाराला कुठला लाभ तर होणार नव्हता? असा संशय बळावतोे. त्यामुळे याप्रकरणातील ठाणेदाराची भूमिका तपासून पाहायला हवी.