नांदगाव बाजार समितीवर दरोडा

By Admin | Updated: January 22, 2016 01:34 IST2016-01-22T01:34:03+5:302016-01-22T01:34:03+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून अज्ञात सात-आठ दरोडेखोरांनी दरोडा घालून चाकुचा धाक दाखवून तूर

Dacoity on Nandgaon Market Committee | नांदगाव बाजार समितीवर दरोडा

नांदगाव बाजार समितीवर दरोडा

नांदगाव खंडेश्वर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून अज्ञात सात-आठ दरोडेखोरांनी दरोडा घालून चाकुचा धाक दाखवून तूर पळविली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दत्ता ससनकर, देवराव राऊत, लक्ष्मण लहाबर, राजेश जयसिंगपुरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी रात्रपाळीला चौकीदार होते. रात्री १ वाजताच्या सुमारास सुरुवातीला तीन अज्ञात दरोडेखोर तारेच्या कम्पाऊंडमधून बाजार समितीत शिरले. त्यांना या चौकीदारांनी हटकले असता दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखविला. या चारही चौकीदारांना शेकोटीजवळ बसविले अणि तेही बसले. त्या तिघांजवळचे मोबाईल दरोडेखोरांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांचे इतर साथीदार बाजार समितीत आले व ओट्यावरील तुरीचे पोते फोडून प्लास्टिकच्या कट्ट्यात तुरी भरून बाजार समितीच्या बाहेर नेल्या. हा घटनाक्रम रात्री ४ वाजेपर्यंत चालला व बाजार समितीच्या कम्पाऊंडबाहेरुन वाहनाने तूर लंपास केल्याचा कयास आहे.

Web Title: Dacoity on Nandgaon Market Committee