सिलिंडरची ‘एक्सपायरी’ ग्राहक अज्ञानीच!

By Admin | Updated: February 15, 2015 00:26 IST2015-02-15T00:26:02+5:302015-02-15T00:26:02+5:30

दैनंदिन जीवनात अत्यावश्यक झालेल्या सिलिंडरचा पुरवठा आणि वापराबाबतचे नियम ग्राहकांना माहितीच नाहीत. या नियमांबाबत वेळोवेळी 'अपडेट' ठेवणे हे गॅस कंपन्यांचे कर्तव्य आहे; ...

Cypriot 'expiry' subscriber ignorant! | सिलिंडरची ‘एक्सपायरी’ ग्राहक अज्ञानीच!

सिलिंडरची ‘एक्सपायरी’ ग्राहक अज्ञानीच!

लोकमत विशेष
सुरेश सवळे अमरावती
दैनंदिन जीवनात अत्यावश्यक झालेल्या सिलिंडरचा पुरवठा आणि वापराबाबतचे नियम ग्राहकांना माहितीच नाहीत. या नियमांबाबत वेळोवेळी 'अपडेट' ठेवणे हे गॅस कंपन्यांचे कर्तव्य आहे; तथापि ग्राहकांना अनभिज्ञ ठेवून गॅस कंपन्या त्यांचे व्यावसायिक लाभ साध्य करवून घेत आहेत.
सिलिंडरला एक्सपायरी डेट असते, हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे? दचकलात ना! पण हे खरे आहे. सिलिंडरही एक्सपायर होते.
अनुदानावर मिळणाऱ्या गॅस धारकांची संख्या जिल्ह्यात ४ लाखांपेक्षा अधिक आहे. प्रत्येक उत्पादनाला जशी निर्मितीची तारीख असते तसे ते उत्पादन किती दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य आहे याचाही अवधी त्या उत्पादनावर नोंदविला असतो. असाच अवधी घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या बाबतीतही आहे. त्यामुळे प्रत्येक गॅसधारकाने घरगुती व व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेताना संबंधित सिलिंडर तपासणे गरजेचे आहे. गॅस सिलिंडरच्या बाबतीत सुरक्षेचे काही मापदंड आहेत. त्यातील महत्त्वाचा घटक आहे. गॅस वितरक आणि गॅस एजन्सीच्या भाषेत सिलिंडरची ‘एक्सपायरी डेट’ यालाच ‘ड्यू फॉर फिजिकल टेस्टिंग’ असे संबोधले जाते. परंतु सर्वसामान्यांच्या भाषेत याला 'एक्सपायरी डेट' असेच म्हणणे संयुक्तिक ठरते. नवीन सिलिंडर घरी किंवा व्यवसायासाठी आणल्यानंतर त्याची पुनर्तपासणीची गरजच ग्राहकांना भासत नाही. याबाबतीत ग्रामीण भागात अनभिज्ञता दिसते. आपण घरगुती किंवा व्यावसायिक सिलिंडर घेत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे.

Web Title: Cypriot 'expiry' subscriber ignorant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.