सिलिंडरचा स्फोट; दोन कुटुंब उघड्यावर

By Admin | Updated: March 8, 2017 00:03 IST2017-03-08T00:03:09+5:302017-03-08T00:03:09+5:30

सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटानंतर दोन घरांची राखरांगोळी झाली. दोन्ही कुटुंबीय उघड्यावर आलेत.

Cylinder blast; Two families open | सिलिंडरचा स्फोट; दोन कुटुंब उघड्यावर

सिलिंडरचा स्फोट; दोन कुटुंब उघड्यावर

भातकुली तालुक्याच्या विर्शी येथील घटना   शासनाकडून सानुग्रह अनुदान    गाईचे वासरू दगावले
अमरावती : सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटानंतर दोन घरांची राखरांगोळी झाली. दोन्ही कुटुंबीय उघड्यावर आलेत. ही घटना सोमवारी भातकुली तालुक्यातील विर्शी गावात घडली. या आगीत झालेल्या नुकसानीबाबत दोन्ही कुटुंबीयांना शासनाकडून सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. विर्शी येथील रहिवासी बाबुलाल फत्तुजी हिवराळे यांच्या घरातील सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे सोमवारी सायंकाळी ६ वाजता अचानक आगीचा भडका उडाला.
वरिष्ठांकडे अहवाल
अमरावती : यावेळी झालेल्या सिलिंडर स्फोटात हिवराळे यांच्या घरासह शेजारी राहणारे महादेव कालुजी राजने यांच्या घर सुध्दा जळुन खाक झाले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, दोन्ही घरे जळुन खाक झाल्यामुळे त्यांची कुटुंबीय उघड्यावर आले होते. या आगीत हिवराळे यांच्या घराच्या आवारातील गोठ्यात असणारे पाच महिन्याचे वासरू सुध्दा दगावले. या घटनेच्या माहितीवरून जिल्हाधिकारी किरण गित्ते व उपविभागीय अधिकारी ओ.पी.लथाड यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार वैशाली पाथरे, नायब तहसिलदार अशोक काळीवकर व प्रविण ढोले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यामध्ये दोन्ही घराचे ३ लाख ८० हजारांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तहसिलदारांनी अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यामुळे तत्काळ दोन्ही बेघर कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून मदत देण्यात आली.

सिलिंडरचा भडका; ‘त्या’ वृद्धेचा मृत्यू
रवीनगर येथील घटना आतापर्यंत १२ घटनांमध्ये शहरात दोन बळी सुरक्षा संबंधी मार्गदर्शनाचा अभाव
अमरावती : सिलिंडरच्या भडक्याने गंभीररीत्या जळालेल्या एका वृद्ध महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. कांता मनोहर भोगे (७०,रा. रविनगर) असे मृताचे नाव आहे. कांता भोगे यांना २० जानेवारी रोजी ४० टक्के जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १५ महिन्यात सिलिंडरच्या भडक्याने दोन जणांचे बळी गेले आहेत.
गॅस सिलिंडरच्या सुरक्षेच्या दृष्टीने वितरक एजन्सीमार्फत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते. मात्र, दरम्यानच्या काळ्यात सिलिंडर ग्राहकांना मार्गदर्शनाचा अभाव दिसून आला. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या भडका उडाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या. मागील वर्षात २२ ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तब्बल सात जण भाजल्या गेले होते. जानेवारी २०१७ मध्येही शहरात सिलिंडर भडक्याच्या दोन घडना घडल्या. संजीवनी कॉलनीतील झालेल्या सिलिंडरच्या भडक्यात दोन विद्यार्थिनी गंभीररीत्या जळाल्या. त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. तसेच २० जानेवारी रोजी रविनगरातील रहिवासी कांता भोगे यांच्या घरातील सिलिंडर भडका उडाला. त्यामध्ये कांता भोगे यांच्यासह शीतल भोगे (२७) व शौनक भोगे (५) हे तिघे भाजल्या गेले. तसेच या भडक्यात त्यांच्या घरातील कारसुद्धा जळून खाक झाली. तिघांचाही उपचार खासगी रुग्णालयात सुरु होता. दरम्यान मंगळवारी कांता भोगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कांता भोगे यांच्या पश्चात एक मुलगा व चार मुली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Cylinder blast; Two families open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.