सायबर लॅबचे आज लोकार्पण

By Admin | Updated: August 15, 2016 00:08 IST2016-08-15T00:08:21+5:302016-08-15T00:08:21+5:30

सायबर क्राईमवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात ४४ ठिकाणी सायबर लॅब लोकार्पित करण्यात येणार आहे.

Cyber ​​Lab Launches Today | सायबर लॅबचे आज लोकार्पण

सायबर लॅबचे आज लोकार्पण

अमरावती : सायबर क्राईमवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात ४४ ठिकाणी सायबर लॅब लोकार्पित करण्यात येणार आहे. सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर अमरावती ग्रामीण व शहर पोलीस विभागातही स्वंतत्र सायबर लॅब लोकार्पित केली जाणार आहे. जिल्ह्यात सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यासंबंधित आता स्वतंत्र तपास यंत्रणा सज्ज राहणार आहे. 
सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने या सायबर लॅबची संकल्पना आली आहे. या लॅबसाठी स्वंतत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

पालकमंत्री प्रवीण पोटे यांची उपस्थिती
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत पोलीस आयुक्तालयात सायबर लॅब तयार केली आहे. या लॅबचे लोकार्पण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी राज्यमंत्री रणजित पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, विशेष आमंत्रितांमध्ये खासदार आनंद अडसूळ, रामदास तडस, महापौर चरणजित कौर नंदा, आ.सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, बच्चू कडू, वीरेंद्र जगताप, अनिल बोंडे, रवि राणा, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले उपस्थित राहतील.

Web Title: Cyber ​​Lab Launches Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.