बँकांमध्ये ग्राहकांची चिक्कार गर्दी

By Admin | Updated: November 11, 2016 00:31 IST2016-11-11T00:31:18+5:302016-11-11T00:31:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद केल्याचा निर्णय जाहीर केला.

Customers moan in banks | बँकांमध्ये ग्राहकांची चिक्कार गर्दी

बँकांमध्ये ग्राहकांची चिक्कार गर्दी

कडेकोट बंदोबस्त : ५००, १००० रुपयांच्या नोटा बदलविण्याची घाई
दर्यापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद केल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या नोटा बदलविण्यासाठी सामान्य नागरिकांनी बँकेमध्ये प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
तालुक्यातील ग्रामीण भागातून सर्वच गौरगरीब शेतकरी, शेतमजूर, व्यापाऱ्यांनी बँकेत चलान बदलविण्यासाठी गुरुवारी धाव घेतली. ज्या खातेदारांचे बँकेत पैसे जमा आहेत त्यांनी यावेळी विड्रॉल केला. मात्र अनेकांना न्याय देणे शक्य नसल्याने बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान मोदींच्या या एकाकी निर्णयामुळे नागरिक खुश आहे. परंतु बँकेमध्ये व्यवहारासाठी प्रत्येकी एका व्यक्तीला फक्त चार हजार रुपये दिले जात असल्याने नागरिकांना बाहेर व्यवहार करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)

शहरात सर्वच बँकांमध्ये गर्दी
५०० ते १००० च्या नोटा बंद केल्यामुळे आता बँकेत फक्त पैसे घेणे सुरू आहे व देणे बंद आहे. त्यामुळे शहरातील महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, सेंट्रल बँक व सर्वच खासगी बँकांमध्ये शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: Customers moan in banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.