संचारबंदीत मोर्शीत भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:23+5:30

लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन होत असल्याने येथील नगरपरिषदेने विशेष पथके राबवून अनेक व्यवसायिकांवर कारवाई केली. दंड वसूल केला. परंतु थोडीशी शिथिलता देताच येथील आठवडी बाजारात भाजीपाला, फळविक्रेता, शेवचिवडा विक्रेता अशा अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने बाजारात तोबा गर्दी झाली.

Curfew in Morshi filled the week market | संचारबंदीत मोर्शीत भरला आठवडी बाजार

संचारबंदीत मोर्शीत भरला आठवडी बाजार

ठळक मुद्देपालिकेने केले हात वर : फिजिक ल डिस्टन्सिंगचा फज्जा, प्रशासन हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : नगरपालिका प्रशासनाने थोडी मोकळीक देताच मंगळवारी हजारो नागरिक घराबाहेर पडले. मोर्शी शहरात मंगळवारचा आठवडी बाजारही बेकायदा भरला. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला.
लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन होत असल्याने येथील नगरपरिषदेने विशेष पथके राबवून अनेक व्यवसायिकांवर कारवाई केली. दंड वसूल केला. परंतु थोडीशी शिथिलता देताच येथील आठवडी बाजारात भाजीपाला, फळविक्रेता, शेवचिवडा विक्रेता अशा अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने बाजारात तोबा गर्दी झाली. एकीकडे नगरपरिषद प्रशासनाने येथील टीव्ही दुरुस्ती केंद्र, लोहारकाम, वेल्डिंग, मोबाईल रिपअ‍ेरिंग सेंटर, किरकोळ साहित्याची विक्री करणारे व्यावसायिक, कूलर दुरुस्ती, मोटर दुरुस्ती, पंचर दुरुस्ती अशा लहान दुकानांना परवानगी नाकारली. परंतु सिमेंट, लोहा, हार्डवेअरसह जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांना मुभा आहे. येथील मॉलला संपूर्ण लॉकडाऊनमध्ये किराणा विक्रीच्या नावावर परवानगी दिली आहे. याठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच मंगळवारी स्थानिक आठवडी बाजार भरल्याने प्रशासनाची पोलखोल झाली आहे.

भाजीपाला व फळे विक्रेत्यांना गावांमध्ये फिरून विक्री करण्याची परवानगी दिली आहे. परंतु ते लोक ऐकत नाहीत. आमच्या पथकाच्या अंगावर येतात. गर्दी झाली हे मान्य आहे. उद्यापासून यंत्रणेद्वारा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- गीता ठाकरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, मोर्शी

Web Title: Curfew in Morshi filled the week market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार