सांस्कृतिक भवन अपहार आठ जणांविरुद्ध फौजदारी

By Admin | Updated: April 30, 2015 00:27 IST2015-04-30T00:27:57+5:302015-04-30T00:27:57+5:30

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाड्याची रक्कम वसूल करुन ती तिजोरीत जमा न करता २० लाख रुपयांच्या......

Cultural Bhavan Aphar, against the eight | सांस्कृतिक भवन अपहार आठ जणांविरुद्ध फौजदारी

सांस्कृतिक भवन अपहार आठ जणांविरुद्ध फौजदारी

झटका : गैरकारभाऱ्यांचा वाढला बीपी
अमरावती : येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाड्याची रक्कम वसूल करुन ती तिजोरीत जमा न करता २० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी महापालिकेतील आठ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यासाठी सिटी कोतवालीत बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली.
बाजार परवाना अधीक्षक एस. ए. भागवत, आर. एफ. डोंगरे, मंगेश वाटाणे, आर. एन. वाकपांजर, श्रीराम आगासे, सतीश देशमुख, अनिकेत मिश्रा, पंकज डोनारकर या आठ जणांवर फौजदारी कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त गुडेवार यांनी दिले आहे. लेखा परीक्षणात सांस्कृतिक भवनात अपहारप्रकरणी आठ कर्मचारी दोषी आढळून आले. उपायुक्त चंदन पाटील यांनी सिटी कोतवालीत तक्रार नोंदविली आहे.
सांस्कृतिक भवनाचे अपहार प्रकरण नगरसेवक प्रदीप बाजड यांनी उघडकीस आणले. १३ जुलै २०११ ते ३१ मार्च २०१२ या दरम्यान सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या नोंदी पुस्तिकात घेतल्या नाहीत.
भाड्याची रक्कम वसूल केल्याची बाब लेखा परीक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे. एकीकडे झालेल्या कार्यक्रमाचे वीज वापराचे रीडिंगची नोंद करण्यात आली. दुसरीकडे याच कार्यक्रमाचे भाड्याच्या रकमेचा कुठेही उल्लेख लेखा परीक्षण विभागाला दिसून आला नाही. त्यामुळे अपहार करताना साखळी प्रक्रियेनुसार कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक भवनाची रक्कम गिळंकृत केली, हे स्पष्ट झाले. विवरणपत्र तपासले असता भाड्याची रक्कम कुठेही नोंद नसल्याने ही आर्थिक फसवणूक गंभीर बाब आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतली. थेट प्रकरण पोलिसात सोपविण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Cultural Bhavan Aphar, against the eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.