दर्यापुरात कोरोना चाचणीदरम्यान व्यापाऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:54+5:302021-03-19T04:12:54+5:30
दर्यापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चाचण्यांचा वेगसुद्धा वाढला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ...

दर्यापुरात कोरोना चाचणीदरम्यान व्यापाऱ्यांची गर्दी
दर्यापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चाचण्यांचा वेगसुद्धा वाढला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोरोना चाचणीसाठी आलेल्या वर्गाकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून आले.
व्यापारीवर्ग सतत ग्राहकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तालुक्यातील व्यापारी वर्ग तसेच प्रतिष्ठानात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली. नगरपालिकेने १२ ते १७ मार्च दरम्यान शहरातील संपूर्ण व्यापारी तसेच त्यांच्या प्रतिष्ठानात काम करणाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. त्यादरम्यान २९१४ अँटिजेन व १३ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. पैकी चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना १४ दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोट
कोरोना चाचणीदरम्यान गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी बॅरीगेटिंग व खुर्च्या लावण्यात आल्या. व्यापारी वर्गाला चाचण्या करून घेण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.
- गीता वंजारी,
मुख्याधिकारी, दर्यापूर