श्रीमंतांच्या वस्तीतील मुलाच्या घरी नातेवाईकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:37 IST2021-02-20T04:37:38+5:302021-02-20T04:37:38+5:30

बुधवारी रात्रीपासून तर शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांच्याकडे नातेवाईक व राजकीय तथा विविध क्षेत्रातील लोकांनी मुलाच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांची आस्थेने ...

Crowds of relatives at the home of a boy in a wealthy neighborhood | श्रीमंतांच्या वस्तीतील मुलाच्या घरी नातेवाईकांची गर्दी

श्रीमंतांच्या वस्तीतील मुलाच्या घरी नातेवाईकांची गर्दी

बुधवारी रात्रीपासून तर शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांच्याकडे नातेवाईक व राजकीय तथा विविध क्षेत्रातील लोकांनी मुलाच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. मुलगा केव्हा मिळणार? तो कसा असेल, अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र, मुलगा सुखरूप असल्याची माहिती दुपारी पोलिसांनी कुटुंबीयांना दिल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतरसुद्धा कुटुंबीयांना भेटण्यासाठी पुन्हा नातेवाईकांनी गर्दी केली. काहींनी मुलगा सुखरुप असल्याबाबत समाधान व्यक्त केले तर काहींनी पोलिसांचे आभार मानले.

बॉक्स:

तीन बहिणांनाही आनंद

पोलिसांनी पुतण्याचा शोध घेतल्याची माहिती पोलिसांच्या पथकासोबत अहमदनगर येथे गेलेले काकांनी अमरावतीला फोन करून परिवारातील सदस्यांना दिली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुलाच्या सख्या मोठ्या बहिणीचा सुद्धा आनंद गगनात मावेनसा झाला. आपला लहान भाऊ नेहमीप्रमाणे पुन्हा आपल्यासोबत खेळणार हा आनंद त्याच्या बहिणींना होता. सदर मुलगा घरात व परिसरात सर्वांचा लाडका असल्याने तो मिळाल्याने परिसरातील लोकांना सुद्धा आनंद झाला आहे.

Web Title: Crowds of relatives at the home of a boy in a wealthy neighborhood