शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मंदिरात उसळली भक्तांची गर्दी तीर्थ, प्रसाद नाही, केवळ दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 5:00 AM

अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर सकाळी ६ पासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवाळी उत्सवामुळे पहाटे व्यापाऱ्यांनी अंबादेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पाडव्याला व्यापारी वर्ग श्रद्धेपोटी देवीचे नारळ आणि देणगीस्वरूपात दिलेल्या पैशांची पावती तिजाेरीत वर्षभर ठेवतात, अशी माहिती अंबादेवी मंदिर संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांनी दिली.

ठळक मुद्देअंबादेवीला फुलांचा साज, एकवीरा देवीला दिव्यांची आरास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गामुळे तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली. पहिल्याच दिवशी प्रसिद्ध अंबा व एकवीरादेवी मंदिरात  हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मात्र, भाविकांना प्रसाद, तीर्थ, ओटी भरणे, अभिषेक अथवा मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यास मनाई करण्यात आली. गुरुद्धारा, चर्च, मशिदीसह अन्य प्रार्थनास्थळीही पूजा-अर्चासाठी सुरू झाली आहे.अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर सकाळी ६ पासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवाळी उत्सवामुळे पहाटे व्यापाऱ्यांनी अंबादेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पाडव्याला व्यापारी वर्ग श्रद्धेपोटी देवीचे नारळ आणि देणगीस्वरूपात दिलेल्या पैशांची पावती तिजाेरीत वर्षभर ठेवतात, अशी माहिती अंबादेवी मंदिर संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांनी दिली. सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान हजारो भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज मंदिर संस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पुजाऱ्यांना फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्ह्जकोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने अंबा व एकवीरादेवी मंदिरातील पुजाऱ्यांना सुरक्षिततेकरिता फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्ह्ज अनिवार्य करण्यात आले आहे. गाभाऱ्यात पुजाऱ्याशिवाय कोणालाही प्रवेश असणार नाही. भाविकांना मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर  या बाबी बंधनकारक केल्या आहेत. 

ओटीचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र जागादेवीला ओटी भरण्यासाठीचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे. महिला भाविकांना अंबा व एकवीरा देवीला ओटी भरण्याचे साहित्य मंदिरात सोबत नेता येणार नाही. मंदिराच्या बाहेरील भागातच ओटीचे साहित्य ठेवण्याची जागा निश्चित केली आहे. 

भाजप, मनसेचा आनंदोत्सवमंदिर भाविकांसाठी खुले झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसेने सोमवारी अंबा व एकवीरा देवी मंदिराबाहेर आनंदोत्सव साजरा केला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अंबादेवी मंदिर संस्थानतर्फे श्रीकांत भारतीय यांचा शाल-श्रीफळ देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. 

मंगळवारी लक्षणीय गर्दीची शक्यताअंबा  व एकवीरा देवीचे मंदिर आठ महिन्यांपासून बंद होते. शासनाने मार्गदर्शक सूचना जारी करून सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केली. मंदिर आठ महिन्यांनंतर खुले केल्यानंतर पहिल्या मंगळवारी  १७ नोव्हेंबर रोजी दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. स्त्री-पुरुष भाविकांना स्वतंत्र्यपणे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोरोना नियमावलीचे पालन करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिराला फुलांनी सजविले असून, दिव्यांची लक्षणीय आरास मांडण्यात आली. - चंद्रशेखर कुळकर्णी, सचिव, एकवीरा देवी संस्थान.