मलिमपूर येथे पाण्यासाठी जनाक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:32+5:302021-06-28T04:10:32+5:30

पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे पाहून शेवटी येथील तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने लेखी निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. मलिमपूर ...

Crowd for water at Malimpur | मलिमपूर येथे पाण्यासाठी जनाक्रोश

मलिमपूर येथे पाण्यासाठी जनाक्रोश

पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे पाहून शेवटी येथील तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने लेखी निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. मलिमपूर गावाला १५ व्या वित्त आयोगातून शासनाचा निधी प्राप्त असतानासुद्धा पाण्याचे बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. येथील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे असल्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना प्रवीण गवळी, राहुल पंडागळे, जय ताटस्कर, अजय धुर्वे, देवेश मोहोड, विशाल डेंडुले, अब्दुल ऐफाज, स्वप्नील वगरे, अभिषेक झोड, रवींद्र बोरवार, पवन मडीकर, शंतनू शेंदरे, शिवा मेश्राम, रितेश मेश्राम, रोशन गजभिये, यश उईके उपस्थित होते.

Web Title: Crowd for water at Malimpur