विद्यापीठात परीक्षा अर्ज सादरीकरणासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:13 IST2021-03-10T04:13:54+5:302021-03-10T04:13:54+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बॅकलॉग विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादरीकरणासाठी एकच गर्दी वाढली आहे. शुल्क भरण्यासाठी खिडक्यांवर पाचही ...

विद्यापीठात परीक्षा अर्ज सादरीकरणासाठी गर्दी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बॅकलॉग विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादरीकरणासाठी एकच गर्दी वाढली आहे. शुल्क भरण्यासाठी खिडक्यांवर पाचही जिल्ह्यांतून विद्यार्थी येत आहेत. बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे.
--------
उत्तमसरा मार्गाची चाळण
बडनेरा : पाच बंगला ते उत्तमसरा मार्गाच्या रस्त्याची चाळण झाली आहे. जड वाहनांच्या वर्दळीने हा मार्ग नादुरुस्त झाला आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गालगत नागरी वस्ती असून, अपघाताची शक्यता बळावली आहे.
----------------
बेलपुरा मार्गावरील रस्त्यावर खड्डे
अमरावती : येथील रेल्वे स्थानक चौक ते बेलपुरा मार्गावरील रस्ता जागोजागी रस्ता उखडला आहे. हा मार्ग सतत वाहतुकीचा असतानाही खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही. नगरसेवकांचे या मार्गाकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
---------------------------
कारागृह वसाहत परिसरात हद्दीत कचरा समस्या
अमरावती : चांदूर रेल्वे मार्गालगतच्या कारागृह वसाहत हद्दीत कचरा समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमधून रहिवासी कचरा याच भागात आणून टाकत असल्यामुळे कचरा समस्या वाढतच आहे. रस्त्यालगत जागोजागी कचरा ही गंभीर बाब ठरत आहे.
-----------------------
उघड्यावरील मांस विक्री कधी रोखणार?
अमरावती : शहरातील उघड्यावरील मांस विक्री ही समस्या कधी संपणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. रस्त्यालगत होणारी मांस विक्री रोखण्यासाठी प्रशासन कधी पाऊल उचलणार, अशी मागणी करण्यात येत आहे.