शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

देशी दारू दुकानातील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

लॉकडाऊन जाहीर होताच केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसायांना प्रतिबंध घालण्यात आला. त्यानुसार अधिकृत दारूविक्री बंद होताच देशी-विदेशी दारू पिणाऱ्या तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला. गावठी दारूची मागणी वाढताच विक्रेत्यांनी भाववाढ करायला सुरुवात केली. एरवी ३०-४० रुपयांना विकली जाणारी हातभट्टीची दारू शंभर ते दीडशे रुपये प्रतिलिटर भावात विकली जाऊ लागली.

ठळक मुद्दे व्यसनावर दुष्काळ पडला भारी : गावठीवरच झाला वारेमाप खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : गावात ८ मे रोजी वाजतगाजत सुरू झालेल्या देशी दारू दुकानापुढील गर्दी आठवडाभरातच ओसरली. मोठ्या खंडानंतर मिळालेल्या दारूचा उत्साहात आस्वाद घेतला. मात्र, आठवडा होत नाही तोच व्यसनावर दुष्काळ भारी पडला. दारूड्यांचा उत्साह पैशांच्या टंचाईमुळे मावळला आहे.लॉकडाऊन जाहीर होताच केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसायांना प्रतिबंध घालण्यात आला. त्यानुसार अधिकृत दारूविक्री बंद होताच देशी-विदेशी दारू पिणाऱ्या तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला. गावठी दारूची मागणी वाढताच विक्रेत्यांनी भाववाढ करायला सुरुवात केली. एरवी ३०-४० रुपयांना विकली जाणारी हातभट्टीची दारू शंभर ते दीडशे रुपये प्रतिलिटर भावात विकली जाऊ लागली. देशी-विदेशी मद्याची दुकाने बंद असल्याने तळीरामांनी लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील जंगलात जाऊन मनमुराद हातभट्टी रिचविली. अव्वाच्या सव्वा दरात तलफ भागविण्यासाठी तळीरामांनी खिशात होता-नव्हता तेवढा पैसा खर्च केला.बेनोड्यातील देशी दारू दुकानात प्रामुख्याने परिसरातील शेतमजुरांची वर्दळ असते. कोरोनानंतरचे लॉकडाऊन आणि अस्मानी दुष्काळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांनी अत्यावश्यक कामांशिवाय इतर कामे स्थगित केली. मजुरांच्या हाताला दररोजच्या कामाची शाश्वती राहिली नाही. पर्यायाने रोजगार कमी झाल्याने अपेक्षित पैसा हातात पडत नसल्याने तळीरामांकडे दारू खरेदी करायला पुरेसा पैसा नाही. दुकाने बंद असताना अवैध विक्रेत्यांकडून दीडशे ते दोनशे रुपयांत खरेदी केलेली पावटी आता ६० रुपयांना मिळत असतानाही पैशांअभावी विकत घेऊ शकत नसल्याचे शल्य तळीरामांच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसून येत आहे.काहीजण बंदीच्या काळात नाहक पैसा खर्च केला, अन्यथा आज चांगला उपयोगात आणता आला असता, गावठी दारूवर केलेल्या खर्चात आज विदेशी मद्याचे सेवन केले असते, अशी पश्चात्तापाची भावना व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदी