जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:48+5:302021-07-08T04:10:48+5:30

अमरावती : शाळेत पाल्यांचा प्रवेश घ्यावयाचा असल्याने महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात दाखला मिळविण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. येथे फिजिकल डिस्टन्सचा ...

Crowd for birth-death certificate | जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी गर्दी

जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी गर्दी

अमरावती : शाळेत पाल्यांचा प्रवेश घ्यावयाचा असल्याने महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात दाखला मिळविण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. येथे फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे.

------------------

इर्विन चौकात पाऊस, पंचवटी कोरडी

अमरावती : शहरातील दुपारी दोनचे सुमारास पावसाचे आगमन झाले. यात जिल्हा स्टेडियम ते राजकमल, राजापेठ येथे चांगलाच पाऊस पडला. मात्र, पंचवटी परिसरात कोरडे होते.

--------------------

कोरोना संसर्गाचा ग्राफ माघारला

(फोटो)

अमरावती : जिल्ह्यात जून महिन्यांपासून संसर्गात कमी आली व दोन दिवसांत पॉझिटिव्हिटीदेखील अर्धा टक्क्यांपेक्षा कमी नोंद झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.

--------------------

महापालिकेत शिरण्यापूर्वी कोरोनाचाचणी

अमरावती : महापालिका परिसरात अभ्यागतांना प्रवेश करण्यापूर्वी रॅपीड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. यात या आठवड्यात पॉझिटिव्हची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

------------------

महापालिकेत वाहनांची गर्दी

अमरावती : महापालिकेत वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना पार्किंगमध्ये जागा मिळत नाही, या विषयीचे नियोजन पुरता कोलमडले आहे.

Web Title: Crowd for birth-death certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.