व्याजाच्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावण्याचा घाट

By Admin | Updated: September 24, 2015 00:18 IST2015-09-24T00:18:13+5:302015-09-24T00:18:13+5:30

१३ व्या वित्त आयोगाच्या निधीवरच्या व्याजाच्या रकमेचा परस्पर विनियोग करून त्यातून धामणगाव रेल्वे मतदारसंघात विकासकामे करण्याचा डाव जि.प.मध्ये मांडला जात आहे.

Crossing the interest amount mutually | व्याजाच्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावण्याचा घाट

व्याजाच्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावण्याचा घाट

सीईओंकडे तक्रार : १३ व्या वित्त आयोगाचा निधी, काँग्रेस सदस्य आक्रमक
जितेंद्र दखने अमरावती
१३ व्या वित्त आयोगाच्या निधीवरच्या व्याजाच्या रकमेचा परस्पर विनियोग करून त्यातून धामणगाव रेल्वे मतदारसंघात विकासकामे करण्याचा डाव जि.प.मध्ये मांडला जात आहे.
१३ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील २७ लाख रुपयांच्या व्याजाची रक्कम सर्वसाधारण सभेत ठराव न मांडता परस्परच मंजुरी देऊन धामणगाव रेल्वे तालुक्यात पळविण्याचा कट सत्ताधाऱ्यांद्वारे रचला जात असल्याची कुणकुण लागताच काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे याबाबत पदाधिकाऱ्यांविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे तक्रारदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. झेडपीच्या सदस्य मंदा गवई, विनोद डांगे, शिवसेनेच्या सदस्य समता भांबुरकर आदींनी यासंदर्भात सीईओंकडे तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Crossing the interest amount mutually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.