भारनियमनामुळे पिके संकटात

By Admin | Updated: October 20, 2014 23:05 IST2014-10-20T23:05:39+5:302014-10-20T23:05:39+5:30

विधानसभा निवडणूक संपताच वरुड तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले असून शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही.

Crop trouble due to weight loss | भारनियमनामुळे पिके संकटात

भारनियमनामुळे पिके संकटात

वरुड : विधानसभा निवडणूक संपताच वरुड तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले असून शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही. कृषिपंपांचे भारनियमन वाढले असल्याने खरीप हंगामातील कपाशी, मिरचीसह संत्रा पिकेसुद्धा धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना नियमित वीज देण्याची मागणी केली जात आहे.
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा संकटाने शेतकरी पूर्णत: खचला आहे. संत्रा आंबिया बहरावर संत्रा उत्पादकांनी समाधान मानले. परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील कपाशी, मिरची, सोयाबीन, तूर सुकायला लागली तसेच संत्रा फळे गळू लागली आहे. नर्सरीमध्ये ेकेलेली जंभेरीची रोपटे सुकू लागली. विहिरीत पाणी आहे. परंतु वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. यासंदर्भात वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही. अभियंते म्हणतात, 'भारनियमनाचे अधिकार आमच्याकडे नाही' यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील गाडेगाव, शेंदूरजनाघाट, पुसलासह आदी वीज कार्यालयांवर शेतकऱ्यांनी धडक देऊन तातडीने वीज भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही भारनियमन कमी झाले नाही. तालुक्यात कृषी पंपाकरिता असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित असतो.
भारनियमन वाढल्याने अनेकांना भरनियमनाचा फटका बसायला लागला आहे. काही भागांत विद्युत रोहित्रांत बिघाड तर काही भागांत वीजपुरवठा खंडित करावा अशी अवस्था असल्याने कपाशी, मिरची, संत्रा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. वरुड तालुक्यात पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार हे निश्चित. एकीकडे निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उधळण तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची च्ािंता आहे. वरुड तालुक्यात संत्रा, मिरची आणि कपाशी उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून डौलदार पिकांना ओलीत करण्याची गरज असताना विजेअभावी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता असल्याने पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crop trouble due to weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.