शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 06:37 IST

आता पुन्हा शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीला राज्याचे जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवटे दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

गजानन मोहोड

अमरावती : सततचा पाऊस अतिवृष्टी, नदीनाल्यांना पूर, रस्ते चिखलात व वारंवार सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष यामुळे राज्यात १.६९ कोटी हेक्टरपैकी ८१.०४ लाख हेक्टर क्षेत्रात म्हणजेच ४७.८९ टक्के क्षेत्रात १४ सप्टेंबरपर्यंत मोबाइल ॲपने पीक पेरा नोंदविण्यात आला. या कालावधीत ६० टक्के नोंद अपेक्षित आहे. आता पुन्हा शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीला राज्याचे जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवटे दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

शेतकऱ्यांना हमीभावाने शेतमालाची विक्री करावयाची असल्यास तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर पिकांची ई-पीक पाहणी आवश्यक आहे.

याशिवाय शासनाने आता पीक विमा, पीक कर्ज, शासन अनुदान वाटप आदींसाठी ई-पीक पाहणी आवश्यक केली आहे. पिकांचा ऑनलाइन पेरा नोंदीशिवाय शेतकऱ्यांना शासन योजनांचा लाभ मिळत नाही.

लागवडयोग्य जमिनीतून पाच गुंठ्यापर्यंत वगळणार

पुणे : खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणीत यंदा प्रत्येक जिल्ह्यातील ५ गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेले स्वमालकीच्या शेतीक्षेत्रातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रात दुरुस्ती होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन ५ गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवासासाठी केला जात आहे. त्याची नोंद शेतीक्षेत्रात होत आहे. प्रत्यक्षात इतक्या कमी क्षेत्रावर लागवड केली जात नाही. त्यामुळे असे क्षेत्र नावावर असलेले जमीनमालक ई-पीक पाहणी करत नाहीत.

भूमिअभिलेख विभागाने या क्षेत्राची जिल्हानिहाय यादी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहे. या यादीची प्रत्यक्ष पडताळणी करून लागवडीखालील क्षेत्रातून हे क्षेत्र वगळण्याचे निर्देश दिले आहेत, असेही दिवसे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी