जिल्ह्यात १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा
By Admin | Updated: September 2, 2014 23:22 IST2014-09-02T23:22:35+5:302014-09-02T23:22:35+5:30
हवामानावर आधारित पीक विमा योजनेला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील सुरूवातीची पीक परिस्थिती लक्षात घेता १६ आॅगस्टपर्यंत राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेला राज्य शासनाने मुदतवाढ देण्यात आली होती.

जिल्ह्यात १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा
उपाययोजना : १ लाख ५३ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
अमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजनेला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील सुरूवातीची पीक परिस्थिती लक्षात घेता १६ आॅगस्टपर्यंत राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेला राज्य शासनाने मुदतवाढ देण्यात आली होती. या दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५३ हजार १०३ शेतकऱ्यांनी १ लाख १८ हजार ३५७ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला आहे.
पावसाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण, अपुरा पाऊस, पावसातील खंड व अतीवृष्टी या हवामान घटकांच्या तीन धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना कार्यान्वित केली आहे. याशिवाय जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसुचित महसूल मंडळस्तरावर क्षेत्र घटकांना गृहीत धरून ही योजना राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
या शेवटच्या मुदतीपर्यंत राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सुमारे १ लाख ५३ हजार १०३ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पीक विमा काढला. यामध्ये सुमारे १ लाख १८ हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर राष्ट्रीय पीक विमा योजनेचे कवच यामुळे राहणार आहे.
राष्ट्रीय पीक विमा योजनेत ६११ कोटी रूपयांची पीक विमा हप्त्याची रक्कम आहे. परंतु पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. (प्रतिनिधी)