पालकमंत्र्यांद्वारा धानोरा म्हाली शिवारात पीकपाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:16 IST2021-09-15T04:16:36+5:302021-09-15T04:16:36+5:30

पंचनामे करून वरिष्ठांना पाठविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश चांदूर रेल्वे : तालुक्यातील धानोरा वाली येथे पुराने झालेल्या शेतातील खरीप पिकाची जिल्ह्याच्या ...

Crop inspection in Dhanora Mhali Shivara by the Guardian Minister | पालकमंत्र्यांद्वारा धानोरा म्हाली शिवारात पीकपाहणी

पालकमंत्र्यांद्वारा धानोरा म्हाली शिवारात पीकपाहणी

पंचनामे करून वरिष्ठांना पाठविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

चांदूर रेल्वे : तालुक्यातील धानोरा वाली येथे पुराने झालेल्या शेतातील खरीप पिकाची जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतीच पाहणी केली. नुकसानाचा पंचनामा करून त्वरित वरिष्ठांना पाठविण्याचे आदेश त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिला.

महिला बालकल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हली येथे माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी सभापती जगदीश आरेकर, धानोराच्या सरपंच नलगे यांच्या उपस्थितीत रविवारी पीकपाहणी केली. यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाची सविस्तर माहिती दिली. नुकसानाची भरपाई ताबडतोब देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी माजी सभापती आरेकर यांनी माजी आमदार जगतापच्या माध्यमातून ना. यशोमती ठाकूर यांना केली. शेतकऱ्याच्या लेखी मागणी घेऊन शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. याबाबतीतील शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठांना तत्काळ सादर करावे, अशी निर्देश यावेळी उपस्थित असलेल्या महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले.

140921\1354-img-20210914-wa0041.jpg

photo

Web Title: Crop inspection in Dhanora Mhali Shivara by the Guardian Minister