अमरावतीमध्ये १९५ रुग्णांची गंभीर स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST2021-03-01T04:15:02+5:302021-03-01T04:15:02+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढताच आहे. १ जानेवारीनंतरच्या ५७ दिवसांत तब्बल १४,४५७ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यातील ...

अमरावतीमध्ये १९५ रुग्णांची गंभीर स्थिती
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढताच आहे. १ जानेवारीनंतरच्या ५७ दिवसांत तब्बल १४,४५७ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांत सध्या ४,९८२ बेड उपलब्धता आहे व १,४९१ रिक्त आहे. मात्र, संसर्ग असाच राहिल्यास स्थिती स्फोटक होणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार, सद्यस्थितीत ४,८६६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ३,४४७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. यामध्ये १९५ रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. आतापर्यंत ५०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये फेब्रुवारीच्या २७ दिवसांत ८२ संक्रमितांचे मृत्यू झाले. मृत्युदर सध्या १.५ टक्के आहे. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत ३९६ मृत्यू झाले होते व प्रमाण २ टक्के असे होते. संक्रमणाच्या ११ महिन्यांच्या काळात रोज सरासरी ९९ रुग्णांची नोंद होत आहे, तर या आठवड्यात चाचण्यांमध्ये सरासरी ३८ टक्के पॉझिटिव्हिटी राहिली आहे.
१ जानेवारी ते २७ जानेवारीपर्यंत रुग्ण : १४,४५७
होम आयसोलेशनमध्ये उपचार :३,४४७
रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण : १४१९
व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण : ३३
आयसीयूमध्ये दाखल रुग्ण : ३४८
३१ डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या : १९,६६८
गंभीर रुग्ण :०३
३१ डिसेंबरपर्यंत मृत्यू ३९६