भातकुली तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST2021-07-09T04:09:39+5:302021-07-09T04:09:39+5:30
टाकरखेडा संभु : भातकुली तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना पावसाने बारा ते पंधरा दिवसांपासून दडी ...

भातकुली तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
टाकरखेडा संभु :
भातकुली तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना पावसाने बारा ते पंधरा दिवसांपासून दडी मारलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव कासावीस झाला असून, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात पाऊस बरसला नाहीतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर्षी आधीच मान्सून बरसला. त्यामुळे शेतकरी चांगला सुखावला आणि जुलैपासून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. भातकुली तालुक्यात आतापर्यंत ७० टक्के पेरणी झालेली आहे. सुरुवातीला चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारली आहे. दहा ते बारा दिवसांपासून भातकुली तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात कापसाची सर्वाधिक १०२ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. त्यापाठोपाठ सोयाबीनची ६५, तुरीची ६२ टक्के, मूग २५ टक्के, उडीद ७१ टक्के, ज्वारी १५ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. अशातच आता दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. आठ दिवसात दमदार पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
080721\img-20210708-wa0049.jpg
टाकरखेडा संभु येथील शेतकरी पेरणी करीत आहे