शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'कॉल्स स्पूफिंग'चे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 22:54 IST

मोबाईलवर येणारा कॉल कुणाचा आहे, हे पाहणे शक्य असले तरी एखादा मोबाईल कॉल आपल्याला संभ्रमात पाडणारा ठरू शकतो.

ठळक मुद्देपोलिसांसमोर आव्हान : फसवणुकीची दाट शक्यता

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोबाईलवर येणारा कॉल कुणाचा आहे, हे पाहणे शक्य असले तरी एखादा मोबाईल कॉल आपल्याला संभ्रमात पाडणारा ठरू शकतो. आपल्या नकळत मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेक कॉल केले जाण्याची शक्यता आहे. आता पोलिसांना यासंदर्भातील तक्रारी प्राप्त होत आहेत. सायबर गुन्हेगार 'कॉल्स स्पूफिंग'द्वारा दुसऱ्यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करीत असून, फसवणूक झाल्यास संबंधित मोबाइलधारकांवर आळ येण्याची शक्यता वाढली आहे. यासंदर्भात तपासकार्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.शहरातील काही नागरिकांना एका क्रमांकावरून कॉल येत आहे. त्यावर समोरील व्यक्ती संवाद साधून विविध प्रकारची माहिती विचारत आहे. मात्र, त्याच क्रमांकावर पुन्हा कॉल केल्यास तो मोबाईल क्रमांक दुसºयाचा असल्याचे लक्षात येते. हा प्रकार काय आहे, असा प्रश्न मोबाइलधारकांना पडत आहे. हे कॉल 'कॉल्स स्पूफिंग' या तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाऊ शकतात. अमरावती शहरातील काही नागरिकांना अशा प्रकारचे कॉल आले आहेत.शहरातील एका व्यक्तीला एका अज्ञात क्रमांकावरून कॉल करून बँकेविषयक माहिती विचारण्यात आली. त्यांनी माहिती दिली नाही. मात्र, तो क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवला. काही दिवसानंतर त्या व्यक्तीने त्याच मोबाइल क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी कॉल केला असता, तो अमरावतीमधीलच एका व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. दोघांनाही एकमेकांशी संवाद साधून शंकेचे निरसन करून घेतले. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने असा कॉल केला नसल्याचे त्यांच्यातील वार्तालापावरून आढळून आले. त्यामुळे आता मोबाईलवर येणारा प्रत्येक कॉल हा ओळखीतील व्यक्तीच करेल, याची शाश्वती उरलेली नसल्याचे दिसून येत आहे. तुम्हाला ओळखीतील व्यक्तीचा व तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह असलेल्या नावानेच कॉल येऊ शकतो. मात्र, त्या क्रमाकांवरून आलेला कॉल ओळखीतील त्याच व्यक्तीने केला आहे का, यांची गॅरंटी नाही. तो क्रमांक दुसऱ्याच कुणी ‘कॉल्स स्पूफिंग’चा वापर करून डायल केल्याची शक्यता आहे. यासंदर्भात अमरावती पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सायबर गुन्हेगार असे तंत्र वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता अमरावतीकरांवर 'कॉल्स स्पूफिंग'चे संकट असल्याची चिन्हे दिसत आहेत.काय आहे कॉल्स, मेसेज, ई-मेल स्पूफिंग?इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार 'कॉल्स, मेसेज व ई-मेल स्पूफिंग' हे अ‍ॅप घेतात. त्या माध्यमातून दुसºयाच्या मोबाईल क्रमाकांचा वापर करून कॉल किंवा संदेश पाठवितात. या यंत्रणेचा गैरफायदा घेत नागरिकांची फसवणूकसुद्धा करू शकतात. मुंबई, पुणे, बंगळुरु या शहरांमध्ये 'कॉल्स व मेसेज स्पूफिंग'चे प्रकार घडले असून, त्याविषयी चौकशी होत असल्याची माहिती अमरावती सायबर सेलच्या अधिकाºयांनी दिली आहे.महिलांच्या फसवणुकीची अधिक शक्यता'कॉल्स व मेसेज स्पूफिंग'च्या माध्यमातून एखाद्या महिलेस ओळखीतील व्यक्तीच्या नावे कॉल आला असेल, तर त्या महिलांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. संबंधित नावाने तो कॉल येत असल्यामुळे महिला विश्वास ठेवून त्या व्यक्तीशीसंवाद साधू शकतात.नागरिकांनी काय करावे ?एखादा कॉल संशयास्पद वाटल्यास नागरिकांनी तो मोबाइल क्रमांक सेव्ह करून ठेवावा. काही वेळानंतर पुन्हा त्याच क्रमांकावर कॉल करून शहानिशा करावी. तो फसवा कॉल वाटल्यास स्क्रिन शॉट काढून ठेवावा. यासंदर्भातील माहिती संबंधित पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे द्यावी.तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगार काहीही करू शकतात. दुसºयाच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करणेही शक्य झाले आहे. अशा प्रकारचे कॉल आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त