अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या शाळांवर फौजदारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST2021-06-20T04:10:34+5:302021-06-20T04:10:34+5:30

----------------------------------------------------------------------------- बच्चू कडू; कारवाईचा धडाका, पालकांना दिलासा_ अमरावती : कोरोनाकाळात बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणाऱ्या शाळांविरोधात ...

Criminalize schools that charge extra | अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या शाळांवर फौजदारी करा

अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या शाळांवर फौजदारी करा

-----------------------------------------------------------------------------

बच्चू कडू; कारवाईचा धडाका, पालकांना दिलासा_

अमरावती : कोरोनाकाळात बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणाऱ्या शाळांविरोधात थेट फौजदारी दाखल करा, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारीची दखल घेत ना. कडू यांनी

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक घेतली व पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

गतवर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याऐवजी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. असे असतानाही ज्या बाबींची सेवाच मिळालेली नाही, अशा अनेक बाबींचे शुल्क वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. मुळात शाळाच बंद असताना असे शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयानेदेखील नैसर्गिक आपत्तीकाळात शाळांनी अतिरिक्त शिक्षण शुल्क आकारू नये, असे निर्देश दिले आहेत. परंतु, नागपूर विभागातील काही शाळा याकडे दुर्लक्ष करीत शिक्षण शुल्क वसूल करत आहेत. याबाबत नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारीची दखल घेत ना. कडू यांनी

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक घेतली व पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

बैठकीला विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जमादार, सहायक संचालक सतीश मेंढे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, विभागीय शुल्क नियमन समिती सदस्य चंद्रमणी बोरकर, बबिता शर्मा, ॲड. पवन सहारे, अक्षय गुळ, गुल्हाने, अजय चालखुरे, अमित होशिंग आदी पालक उपस्थित होते.

----------------

अधिनियमांची कठोर अंमलबजावणी करा

राज्य शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम २०११ ची संपूर्ण राज्यात कठोर अंमलबजावणी करा. प्रत्येक नियमाचे शाळांनी पालन करावे. कुठेही अतिरिक्त शुल्क आकारल्याचे आढळता कामा नये. पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आवश्यक तपासणी, कारवाई वेळीच करावी, असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले.

Web Title: Criminalize schools that charge extra