बडनेऱ्यात रेल्वे तिकीट निरीक्षकावर फौजदारी

By Admin | Updated: July 13, 2015 00:28 IST2015-07-13T00:28:27+5:302015-07-13T00:28:27+5:30

प्रवाशाला असभ्य वागणूक दिल्याप्रकरणी बडनेरा येथील रेल्वे तिकीट निरीक्षकावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

Criminal to Railway Ticket Inspector in Badnera | बडनेऱ्यात रेल्वे तिकीट निरीक्षकावर फौजदारी

बडनेऱ्यात रेल्वे तिकीट निरीक्षकावर फौजदारी

प्रवाशाची तक्रार : प्रशासनाने रोखली वेतनवाढ
अमरावती : प्रवाशाला असभ्य वागणूक दिल्याप्रकरणी बडनेरा येथील रेल्वे तिकीट निरीक्षकावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. अमित गोंडाणे नामक तिकीट निरीक्षकावर रेल्वे पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नांदगाव खंडेश्वर येथील सुरेश राजगुरे हे कुटुंबासह बडनेरा रेल्वे स्थानकावर गोंडवाना एक्स्प्रेस आले असता साध्या वेशातील एका व्यक्तीने प्लॅटफार्मवर तिकीट असल्याची विचारणा केली. पंरतु सदर व्यक्ती ही साध्या वेशात असल्याने ती रेल्वे तिकीट निरीक्षक कशावरुन, असा प्रश्न राजगुरे यांनी अमित गोंडाणे यांना विचारला. तेव्हा मी कोण आहे? हे मी तुम्हाला दाखवितो, असे म्हणून तिकीट निरीक्षक कक्षात नेऊन राजगुरे कुटुंबीयांना असभ्य भाषेत खडसावले. गोंडाणे यांनी ओळखपत्र दाखविले तेव्हा राजगुरे यांनीदेखील प्रवासाची तिकीट दाखविली. मात्र साध्या वेशात अथवा कर्तव्याची ओळख न होऊ देणाऱ्या तिकीट निरीक्षकांनी अर्ध्या तासभर राजगुरे यांच्यासह कुटंबीयांना ताटकळत ठेवल्याप्रकणी पोलिसात तक्रार देण्यात आली.
कारवाईची सेवापुस्तिकेत नोंद
अमरावती : गोंडाणे यांची कर्तव्यावर भुसावळ अंतीम केंद्राजवळ तैनात करण्यात आले असताना ते मध्यभागी प्लॅटफार्मवर कसे होते? असे तक्रारीत सुरेश राजगुरे यांनी म्हटले होते. गोंडाणे हे कर्तव्यावर असताना इतरत्र भटकणे, प्रवाशांना त्रास देणे, पोषाख परिधान न करणे अशा विविध कारणांमुळे भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे वाणिज्य प्रबंधकांनी त्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. कारवाई झाल्याप्रकरणाची नोंद सेवापुस्तिकेत घेण्यात आली आहे. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी भादंविच्या ५०९ कलामातंर्गत गुन्हे दाखल करुन वरिष्ठांना अहवाल कळविला आहे.

Web Title: Criminal to Railway Ticket Inspector in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.