निकृष्ट बियाणे विकल्यास फौजदारी कारवाई

By Admin | Updated: July 21, 2014 23:36 IST2014-07-21T23:36:28+5:302014-07-21T23:36:28+5:30

निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई आणि पीक विमा योजनेची योग्य प्रसिद्धी न करणाऱ्या अमरावती व नागपूरच्या विभागीय कृषी सहसंचालकांना कारणे दाखवा नोेटीस

Criminal action for selling sown seeds | निकृष्ट बियाणे विकल्यास फौजदारी कारवाई

निकृष्ट बियाणे विकल्यास फौजदारी कारवाई

अमरावती : निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई आणि पीक विमा योजनेची योग्य प्रसिद्धी न करणाऱ्या अमरावती व नागपूरच्या विभागीय कृषी सहसंचालकांना कारणे दाखवा नोेटीस बजावण्यात आल्याची माहिती, राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रपरिषदेत दिली. 'लोकमत'ने हे मुद्दे लावून धरले होते, हे येथे उल्लेखनीय.
जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती गंभीर आहे. अद्याप केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरमधील संत्रा पिकांचे दोन हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी मान्य केले. संत्र्याचा मृगबहर पावसाअभावी नष्ट झाला. तो पुन्हा येणे शक्य नाही. आंबिया बहराचीदेखील गळ झाली आहे. यासाठी पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. संत्रा उत्पादकांना एकरी २५ हजार रूपयांच्या मदतची मागणी आढावा बैठकीत आमदारांनी केली असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा झाली.

Web Title: Criminal action for selling sown seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.