पशुपालकांवर फौजदारी कारवाई
By Admin | Updated: January 6, 2015 22:53 IST2015-01-06T22:53:10+5:302015-01-06T22:53:10+5:30
पशुवैद्यकीय विभागातर्फे अनधिकृत पशुपालनाच्या व्यवसाय करणारे पशुपालक यांच्यावर ५ जानेवारीला कारवाई करण्यात आली. याविषयीची तक्रार जनार्दनपेठ येथील नागरिकांनी केली होती.

पशुपालकांवर फौजदारी कारवाई
अमरावती : पशुवैद्यकीय विभागातर्फे अनधिकृत पशुपालनाच्या व्यवसाय करणारे पशुपालक यांच्यावर ५ जानेवारीला कारवाई करण्यात आली. याविषयीची तक्रार जनार्दनपेठ येथील नागरिकांनी केली होती. आयुक्तांच्या आदेशानुसार जनार्दनपेठ येथे संबंधित पशुपालकांवर फौजदारी तथा त्यांची ४ जनावरे जप्त करण्यात आली.
रामपुरी कॅम्प येथे रस्त्याचे काम सुरू असताना येथील ४ पशुपालकांना वारंवार नोटीस देऊनही त्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे रस्त्याचे काम व्यवस्थित होत नव्हते. संबंधित तक्रारींची दखल घेऊन आयुक्तांनी तातडीने आदेश देऊन थेट जनावरांची जप्ती व संबंधित पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले.
शेणखत तथा उपद्रवी पशुपालनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे परिसरात विविध प्रकारचे आजार बळावले आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी पशु वैद्यकीय विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. (प्रतिनिधी)