शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 27, 2023 19:06 IST

Amravati News राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला.

गजानन मोहोडअमरावती : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतली आहे. त्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आधी शरयू नदीत डुबकी मारून प्रायश्चित करावे, मगच भाजपवर आरोप करावेत, असे ते म्हणाले.

महसूल विभागाच्या आढावा बैठकीसाठी ना. विखे पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत सातत्याने अपमान केल्या जात असताना उद्धव ठाकरे यांना महाआघाडी करून अडीच वर्षे सत्तेचा उपभोग घेताना सुचले नाही. त्याचवेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होते. हे हिंदुत्वाचे बेगडी प्रेम असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपने पाठीत खंजीर खुपसला असे ते म्हणतात हे चुकीचे आहे. याउलट सत्तेकरिता त्यांनी हिंदुत्व सोडले. आता सत्ता गेल्यानंतर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श वाटू लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्याचवेळी त्यांनी आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे होते किंवा काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढायला पाहिजे होते. त्यांनी हिंदुत्वाचा फक्त सत्ता मिळविण्यासाठी उपयोग केला. आता त्यांनी तो अधिकार गमाविला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पहिले भारतरत्न द्यावे, यासाठी आम्हाला अंबादास दानवेंच्या शिफारशीची गरज नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्या नेत्यांनी फारकत घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जातात, त्याचे प्रायश्चित्त पहिले करा. नंतरच भाजपवर आरोप करा, असा सल्ला ना. विखे पाटील यांनी दिला.

‘भारत जोडो’दरम्यान ‘काँग्रेस छोडो’ सुरूसत्ता गेल्याचे काँग्रेसला वैफल्य आहे. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत ४० चा आकडाही पार करू शकले नाहीत. जनतेने नाकारले हे वास्तव का स्वीकारत नाही, त्यासाठी यात्रा काढून पाहिल्या. प्रतिसाद मिळत नसल्याने राहुल गांधी सावरकरांवर आरोप करीत आहेत. त्यांनी आत्मविश्वास गमाविला आहे. जनता त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान इकडे काँग्रेस छोडो सुरू होते, यासाठी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील