पथ्रोटच्या सरपंचावर ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा
By Admin | Updated: February 9, 2015 23:04 IST2015-02-09T23:04:49+5:302015-02-09T23:04:49+5:30
पथ्रोट ग्रा.पं.च्या महिला सरपंच्याविरोधात भरसभेत जातीवाचक शिविगाळ केल्याच्या ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून अॅट्रोसिटीची गुन्हा नोंदविण्यात आला.

पथ्रोटच्या सरपंचावर ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा
शिंदी (बु.) : पथ्रोट ग्रा.पं.च्या महिला सरपंच्याविरोधात भरसभेत जातीवाचक शिविगाळ केल्याच्या ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून अॅट्रोसिटीची गुन्हा नोंदविण्यात आला.
पथ्रोट ग्रा.पं.च्या आमसभेत ग्रामपंचायत सदस्य मंगला बादल यांनी मागासवर्गातील नागरिकांच्या दारिद्र्यरेषेखालील गुणांबाबत विचारणा केली असता सरपंच मंगला डिके यांनी त्यांना जातीवाचक शिविगाळ केली होती. याची तक्रार मंगला बादल यांनी पथ्रोट पोलीस ठाण्यात केली होती. मंगला बादल यांनी दिली होती. चौकशी, पुराव्यांच्या तपासणीअंती ग्रामपंचायत सरपंचा मंगला डिके यांच्यावर अॅट्रासिटी कायद्यांतर्गत कलम ३(१) (१०) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ जानेवारी रोजी पथ्रोट ग्रा. पं. परिसरात ग्रामसभा सुरू असताना हा प्रकार घडला होता.
ग्रा.पं. सदस्य मंगला बादल यांनी सदस्य या नात्याने गावातील मागास वर्गातील लोकांच्या दारिद्र्यरेषेखालील गुणांच्या बाबतीत सरपंच व सचिवांना विचारणा केली असता सरपंच मंगला डिके यांनी बादल यांना उपस्थित गावकऱ्यांसमोर जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी केलेल्या चौकशी व पुराव्यांच्या तपासणीअंती सरपंच मंगला डिके यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ेसरपंच मंगला डिके यांच्यावर पुढे कोणती कारवाई होणार, याकडे परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)