युवतीला मोबाईल क्रमांकावरून वारंवार त्रास देणाऱ्या युवकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST2021-07-09T04:09:59+5:302021-07-09T04:09:59+5:30
अमरावती : युवतीला आरोपीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधून त्रास दिल्याबद्दल तरुणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी एका अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा ...

युवतीला मोबाईल क्रमांकावरून वारंवार त्रास देणाऱ्या युवकावर गुन्हा
अमरावती : युवतीला आरोपीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधून त्रास दिल्याबद्दल तरुणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी एका अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. ही घटना ६ जुलै रोजी घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (ड), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपीने तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून बोलायचे असल्याचे सांगितले. तो स्वत:चे नाव सांगत नव्हता. फिर्यादीने तो क्रमांक ब्लॉक केला असता, त्यानंतर त्याने दुसऱ्या क्रमांकावरून तरुणीशी संपर्क साधला. तो वारंवार फोन करीत असल्याने तिने ही बाब भावाला सांगून त्याच्याकडे फोन दिला. भावाने पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे आरोपीला म्हटले असता, तुझ्याकडून जे होते ते करून घे, अशी आरोपीने धमकी दिली. त्यानंतर युवतीने ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.