युवकाच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेशातील चालकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST2021-09-22T04:15:14+5:302021-09-22T04:15:14+5:30

-------------- वाहनाच्या केबिनमधून मोबाईल फोन लंपास वरूड : शहरातील एका हॉस्पिटलपुढे अक्षय जगदीश गजामे (२८, रा. प्रभात पट्टण, जि. ...

Crime against driver in Uttar Pradesh in youth death case | युवकाच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेशातील चालकाविरुद्ध गुन्हा

युवकाच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेशातील चालकाविरुद्ध गुन्हा

--------------

वाहनाच्या केबिनमधून मोबाईल फोन लंपास

वरूड : शहरातील एका हॉस्पिटलपुढे अक्षय जगदीश गजामे (२८, रा. प्रभात पट्टण, जि. बैतूल) याने लावलेल्या वाहनाच्या केबिनमधून मोबाईल लंपास करण्यात आला. याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

थोडक्यात वाचली अल्पवयीन मुलीची अब्रू

तळेगाव दशासर : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय मुलगी अब्रू गमावण्यापासून थोडक्यात वाचल्याचा घटनाक्रम पुढे आला आहे. १७ सप्टेंबर रोजी ती शाळेत जात असताना गावातीलच २५ वर्षीय युवकाने दुचाकीने तिला गाठले. हात पकडून जबरीने तिला दुचाकीवर बसविले आणि पुढील गावापर्यंत घेऊन गेला. यावेळी त्याच्या भावाचा फोन आल्याने त्याने मुलीला परत शाळेजवळ आणून सोडले. तळेगाव दशासर पोलिसांनी याप्रकरणी भादंविचे कलम ३५४, पोक्सो अन्वये गुन्हा नोंदविला. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याची गजाआड रवानगी झाली आहे.

Web Title: Crime against driver in Uttar Pradesh in youth death case