क ोचिंग क्लास संचालकाविरुद्ध गुन्हे

By Admin | Updated: February 10, 2016 00:17 IST2016-02-10T00:17:50+5:302016-02-10T00:17:50+5:30

शहरातील राजापेठ भागातील रिअल-एबल कोचिंग क्लासच्या संचालकांविरूध्द सोमवारी राजापेठ पोलिसांनी गुन्हे नोंदविले.

Crime against the Doctrine Class Manager | क ोचिंग क्लास संचालकाविरुद्ध गुन्हे

क ोचिंग क्लास संचालकाविरुद्ध गुन्हे

रेलिंग तुटल्याची घटना : इमारत मालकासह संचालकांवर ठपका
अमरावती : शहरातील राजापेठ भागातील रिअल-एबल कोचिंग क्लासच्या संचालकांविरूध्द सोमवारी राजापेठ पोलिसांनी गुन्हे नोंदविले. ७ फेब्रुवारीला या क ोचिंग क्लासचे रेलिंग तुटल्याने १० विद्यार्थी पहिल्या माळ्यावरून खाली कोसळून जखमी झाले होते. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी शैलेंद्र सलुजा आणि राहुल उंबरकर या दोघांविरुध्द भादंविचे कलम ३३६,३३७,३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. घरमालक आणि संचालकांच्या हयगयीमुळेच १० मुले जखमी झाल्याचा आरोप राजापेठ ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे.
८ फेब्रुवारीला उशिरा रात्री गुन्हे दाखल करण्यात आलेत. चौकशी दरम्यान उपरोक्त कोचिंग क्लासेसचे संचालक शासन अनुदानित शाळेत सेवारत असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे शहरातील या कोचिंग क्लासेसवर अंकुश कोणाचा हा प्रश्न देखील चर्चेस आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार न करता केवळ पैशांच्या हव्यासापायी सुरू असलेल्या या कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.सोमवारी या कोचिंग क्लासच्या पहिल्या माळ्यावरील गॅलरीतील रेलिंगचे कठडे तुटल्याने १० विद्यार्थी पहिल्या माळयावरुन खाली कोसळले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against the Doctrine Class Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.