अखेर गोविंदपूर येथील क्रिकेटचे सामने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:24 IST2021-02-21T04:24:35+5:302021-02-21T04:24:35+5:30

करजगाव : आर. आर. पाटील सुंदर व स्वच्छ गाव योजनेत अव्वल आलेल्या गोविंदपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून ग्रामपंचायतने ...

Cricket matches at Govindpur finally canceled | अखेर गोविंदपूर येथील क्रिकेटचे सामने रद्द

अखेर गोविंदपूर येथील क्रिकेटचे सामने रद्द

करजगाव : आर. आर. पाटील सुंदर व स्वच्छ गाव योजनेत अव्वल आलेल्या गोविंदपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून ग्रामपंचायतने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. त्याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित होताच ते रद्द करण्यात आले.

सामने ज्या मैदानात खेळविले जात होते, त्या मैदानातील तंबू काढून टाकण्यात आले. ग्रामपंचायत व आयोजकांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजारच्या करजगाव, परतवाडासह चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना, क्रिकेट सामने भरविण्यात आले. त्यामुळे सामने रद्द करण्यात आले असले तरी ग्रामसेवक व अन्य संबंधितांविरुद्ध कारवाई केव्हा, असा प्रश्न गोविंदपूरवासीयांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Cricket matches at Govindpur finally canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.