ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:13+5:302021-04-06T04:12:13+5:30

फोटो पी ०५ भातकुली भातकुली : ग्रामविकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वदूर रस्त्यांचे जाळे उभारण्यात येईल, असे प्रतिपादन ...

Create road network in rural areas | ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणार

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणार

फोटो पी ०५ भातकुली

भातकुली : ग्रामविकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वदूर रस्त्यांचे जाळे उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भातकुली येथे सोमवारी केले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सुमारे ११ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातील विविध ग्रामीण रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी चांगापूर व विविध ठिकाणी झालेल्या भूमिपूजन समारंभाला खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके, जिल्हा परिषदेच्या सभापती संगीता तायडे, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरात अनेक रस्त्यांची निर्मिती होऊन गावे एकमेकांशी जोडली जातील. दळणवळण वाढून व्यवहाराला गती येईल व स्थानिकांचे जीवनमान उंचावेल.

अनेक गावांना जोडणारे रस्ते

केकतपूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्य महामार्ग ३०८ ते माळेगाव-केकतपूर रस्ता, ब्राम्हणवाडा भगत येथे अंतोरा ते ब्राम्हणवाडा रस्त्याचे भूमिपूजन, चांगापूर येथे प्रमुख राज्य महामार्ग १४ ते चांगापूर रस्ता, निमखेड येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्य महामार्ग १४ ते निमखेड रस्ता, निंदोडी येथे राज्य महामार्ग ४७ ते उदापूर-निंदोडी रस्ता, वासेवाडी राज्य महामार्ग २८० ते वासेवाडी रस्ता आदी ११ कोटींहून अधिक रकमेच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले.

चांगापूर तीर्थक्षेत्र विकास

चांगापूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अधिकाधिक विकासकामे राबविण्यात येतील. पौराणिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी प्राधान्याने अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. ‘ब’ वर्ग क्षेत्र समावेश व इतर अपेक्षित कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

केकतपूरला पाणीपुरवठा योजना व व्यायामशाळेचे उदघाटन

केकतपूर येथे रस्त्याच्या शुभारंभाबरोबर नळ पाणीपुरवठा योजनेचाही शुभारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सुमारे २४ लक्ष निधीतून ही योजना साकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केकतपूर येथील व्यायामशाळेचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.

Web Title: Create road network in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.