इंदला गावात गोहत्या

By Admin | Updated: April 1, 2015 00:20 IST2015-04-01T00:20:59+5:302015-04-01T00:20:59+5:30

राज्य शासनाने गोहत्येवर बंदी केल्याने छुप्या मार्गाने गोहत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावात घडला.

Cow slaughter in Indla village | इंदला गावात गोहत्या

इंदला गावात गोहत्या

अमरावती : राज्य शासनाने गोहत्येवर बंदी केल्याने छुप्या मार्गाने गोहत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावात घडला. अज्ञात व्यक्तीने चराई करणाऱ्या गायीची हत्या करुन तिचे मांस चोरुन नेल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. या घटनेनंतर शहरभर संतापाची लाट निर्माण झाली. पोलिसांनी गायीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
पोलीस सूत्रांनुसार, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावातील रहिवासी चिमनाजी नागोराव काटकर (२०) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळी त्यांनी चार गायी मासोेद शिवाराजवळ चराईकरीता सोडल्या होत्या. त्यापैकी तीन गायी परतल्या. मात्र, एक गाय परत आली नाही. त्यांनी गायीचा रात्री शोध घेतला. मंगळवारी सकाळी त्यांनी पुन्हा गायीचा शोध सुरु केला केला. शोधाशोध सुरू असतानाच त्यांना मासोदजवळील वनविभागाच्या नर्सरीपासून २०० मिटर अंतरावर गायीचे अवशेष आढळून आलेत. गायीची निघृण हत्या करुन तिचे अवशेष छिन्नविछीन्न अवस्थेत विखुरले होते. चिमनाजी काटकर यांनी तत्काळ फे्रजरपुरा पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

 

 

Web Title: Cow slaughter in Indla village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.