परतवाड्यात कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:15+5:30
परतवाडा येथील कुटीर रुग्णालयात १० बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील इमारतीचे नूतनीकरण ऑक्सिजन, ट्रामा केअर युनिट व्हेंटिलेटर अशा अतिआवश्यक सुविधा या बाबींवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाहणी करून काही सूचना दिल्यात.

परतवाड्यात कोविड रुग्णालय
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरात असलेल्या कुटीर रुग्णालयात १० बेडचे कोविड रुग्णालय तत्काळ सुरू तयार करण्यासाठी, तर बुरडघाट येथे भविष्यात कोविड रुग्णालय तयार करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी दुपारी ३ वाजता भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात बांधकाम विभागाला काही सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
परतवाडा येथील कुटीर रुग्णालयात १० बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील इमारतीचे नूतनीकरण ऑक्सिजन, ट्रामा केअर युनिट व्हेंटिलेटर अशा अतिआवश्यक सुविधा या बाबींवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाहणी करून काही सूचना दिल्यात. यावेळी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, तहसीलदार मदन जाधव, बीडीओ जयंत बाबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय उपअधीक्षक, इतर अधिकारी उपस्थित होते.
कुटीर रुग्णालय येथील सदर कामाची प्रगती पाहून आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. दोन दिवसांत सर्व कामे होणार असल्याचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी सांगितले. कुटीर रुग्णालयाच्या बाजूचे समाजकल्याण विभागाचे वसतिगृह हे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर व कर्मचारी यांच्या निवाºयासाठी व आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तात्काळ आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिले.
बुरडघाट येथे कोविड रुग्णालय दोन
आपत्कालीन परिस्थितीत बुरडघाट येथील समाज कल्याणचे वसतिगृह हे कोविड रुग्णालय क्रमांक२ म्हणून भविष्यात वापरावे लागल्यास तेथील सुविधांची पाहणीसुद्धा जिल्हाधिकाºयांनी केली. येथेच परराज्यातून आलेल्या अचलपूर तालुक्यातील ७९ नागरिकांना निवासी केंद्र तयार केले होते. अचलपूर-परतवाडा शहरासह धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार परिसरात भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास पूर्व नियोजन म्हणून प्रशासनाच्यावतीने सर्व स्तरावर आढावा घेण्यात येत आहे. त्या पद्धतीने तयारी करून वेळेवर गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन तयारीला लागले आहेत.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी परतवाडा कुटीर रुग्णालय व बुरडघाट येथील समाजकल्याण विभागाच्या शाळेत दुसरे कोविड रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या व पाहणी केली.
- संदीपकुमार अपार,
एसडीओ अचलपूर