कैद्यांकरिता कारागृहातच आता कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:56+5:302021-02-05T05:26:56+5:30

अमरावती:/ संदीप मानकर खुनाच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने येथील कोविड रुग्णालयातून गुरुवारी रात्री पलायन केले. त्या ...

Covid Care Center is now a prison for inmates | कैद्यांकरिता कारागृहातच आता कोविड केअर सेंटर

कैद्यांकरिता कारागृहातच आता कोविड केअर सेंटर

अमरावती:/ संदीप मानकर

खुनाच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने येथील कोविड रुग्णालयातून गुरुवारी रात्री पलायन केले. त्या पार्श्वभूमीवर यानंतर आता कैद्यांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार नसून, त्यांच्याकरिता पूर्वीसारखेच मध्यवर्ती कारागृहातच सोमवारपासून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.

पूर्वी लॉकडाऊनमध्ये कैद्यांवर मध्यवर्ती कारागृहातच उपचार करण्यात येत होते. परंतु याला काही नियम व अटी देऊन स्थिलता मिळाली होती. त्यामुळे कोरोनाबाधित कैद्यांना कोविड रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात येत होते. परंतु खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या यवतमाळ येथील गुन्हेगाराने संधी साधून रुग्णालयातून पलायन केले. त्यामुळे पोलीस, आरोग्य प्रशासन व मध्यवर्ती कारागृह प्रशासन अलर्ट झाले आहे. त्या अनुषंगाने यानंतर आता कोरोनाबाधित कैद्यांवर कारागृहातच उपचार करण्यात येणार आहे. त्याकरिता आरोग्य विभाग कारागृह अधीक्षकांना पत्रसुद्धा देणार आहे. या ठिकाणी एक तज्ज्ञ डॉक्टरांची चमू कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता तैनात राहणार असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले.

कोट

यानंतर आता कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित कैद्यांवर उपचार होणार नाही. त्यांच्याकरिता कारागृहातच स्वतंत्र कोविड केअर सेंटर देऊन त्यावर कारागृहातच त्यांच्यावर उपचार होईल.

डॉ. श्यामुसुंदर निकम जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

Web Title: Covid Care Center is now a prison for inmates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.