लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात डेंग्यूची जोरदार साथ पसरली आहे. डासउत्पत्तीवर नियंत्रण नसल्याने या साथीचा फैलाव वेगाने झाला. महापालिकेने डासउत्पत्ती नियंत्रणाचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याऐवजी उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरच चिखलफेक करण्याचे उद्योग आरंभले आहेत. महापालिकेच्या आणि अशाच इतर प्रवृत्तींचा आयएमए तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले.डास नियंत्रण व गरीब रुग्णांकरिता महापालिकेने औषधोपचार उपलब्ध करणे महत्त्वाचे असताना, दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे सर्व भार खासगी डॉक्टरांवर आला. आम्ही अहोरात्र रुग्णसेवेसाठी कार्यरत आहोत; परंतु त्यापोटी आमच्याबाबत अविश्वास निर्माण केला गेला. या कार्यपद्धतीवर लगाम कसण्यात यावा आणि डेंग्यूची साथ पसरू देण्यास जबाबदार असलेल्या यंत्रणेला जाब विचारून साथ नियंत्रणात आणण्यासंबंधिचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी डॉक्टरांनी केली. स्थिती अशीच राहिल्यास शहरात इतर साथरोगांचाही उद्रेक होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी चर्चेदरम्यान दिला.शहरात डेंग्यूने थैमान घातले असताना, काही मंडळीकडून वैयक्तिक राजकीय स्वार्थाकरिता याचे भांडवल करून डॉक्टरांचे ‘लुटारू’ असे चित्र उभे केले गेले. समाजाची घडी विस्कळीत करण्याचा हा प्रकार आहे. वैयक्तिक स्वार्थाकरिता वैद्यकीय व्यावसायिकांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे करून त्यांचे खच्चीकरण आणि चारित्र्यहनन करण्याचा अश्लाघ्य प्रकार सुरू असल्याच्या प्रकाराचा ‘आयएमए’च्या पदाधिकाºयांनी निषेध केला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. पद्माकर सोमवंशी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.वसंत लुंगे, असोसिएशन आॅफ फिजिशियन्सचे अध्यक्ष डॉ.अनिल रोहणकर, बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ.सोनाली शिरभाते यांच्यासह शहरातील अनेक प्रतिथयश डॉक्टर्स उपस्थित होते.ही तर ‘एमसीआय’च्या निर्देशांची पायमल्लीडेंग्यूच्या रुग्णांचे तपासणी रिपोर्ट व रुग्णालयाची कागदपत्रे मागणे ही मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाद्वारे डॉक्टर आणि हॉस्पिटल यांनी रुग्ण आणि त्याच्या आजारासंदर्भात पाळावयाच्या गोपनियता निर्देश (कोड आॅफ कंडक्ट)ची पायमल्ली होईल. रूग्णांचे केसपेपर लीक झाल्यास जबाबदार कोण, अशा सवाल ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला.महापालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत काय?रुग्णांचे केसपेपर सादर केल्यास यामधील वैद्यकीय बाबी व बारकावे अभ्यासणारे उच्चविद्याविभूषित तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेकडे आहेत काय, जे नुसते केसपेपर बघून आपले निर्णायक मत देण्यास पात्र आहेत, असा सवाल ‘आयएमए’द्वारे करण्यात आला. या बाबी महापालिकेने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. ही क्षमता प्रशासनाकडे असेल, तरच पुढची प्रक्रिया करण्यास अर्थ राहील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.महापालिकेकडे सक्षम आरोग्य यंत्रणाच नाहीशहरात डेंग्यूच नाही, हा महापालिकेचा दावा हास्यास्पद आहे. डास निर्मूलनात आलेले अपयश, शहरात सर्वत्र विखुरलेला ओला कचरा, पावसानंतर तुंबलेल्या नाल्या, रखडलेली भुयारी योजना आदी बाबींमुळे जर डेंग्यू व इतर विषाणूंमुळे होणाºया संसर्गजन्य आजाराचा उदे्रक रोखण्यास महापालिका प्रशासन कमी पडले, तर त्याचे खापर डॉक्टरांवर फोडणे हे तर्कसंगत आहे का? वस्तुस्थिती अशी आहे, असा उद्रेक झाल्यास हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नाही, असे ‘आयएमए’च्या पदाधिकाºयांनी सांगितले.समाजाच्या विश्वासाला सुरुंग लावण्याचा प्रकारजर कुठले रुग्णालय किंवा डॉक्टरांबाबत कुणाला काही तक्रार असेल, तर कन्झ्यूमर फोरम, आयएमए, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया वा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्याची कायदेशीर तरतूद आहे. मात्र, स्वत:च न्यायाधीश बनून समाजाची दिशाभल करणे आणि समाज व डॉक्टरांच्या विश्वासाच्या धाग्याला सुरुंग लावणे कितपत योग्य, असा सवाल यावेळी करण्यात आला.
डेंग्यूचे अपयश झाकण्यासाठीच डॉक्टरांवर खापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:53 IST
महापालिका क्षेत्रात डेंग्यूची जोरदार साथ पसरली आहे. डासउत्पत्तीवर नियंत्रण नसल्याने या साथीचा फैलाव वेगाने झाला. महापालिकेने डासउत्पत्ती नियंत्रणाचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याऐवजी उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरच चिखलफेक करण्याचे उद्योग आरंभले आहेत.
डेंग्यूचे अपयश झाकण्यासाठीच डॉक्टरांवर खापर
ठळक मुद्दे‘आयएमए’ने केला निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, इतर साथरोगांचाही इशारा