‘रंगोली’प्रकरणी न्यायालयाचा स्थगनादेश
By Admin | Updated: October 15, 2015 00:15 IST2015-10-15T00:15:14+5:302015-10-15T00:15:14+5:30
स्थानिक कठोरा मार्गावर असलेल्या रंगोली लॉन, मंगल कार्यालयाचे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या ‘डेड लाईन’वर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी स्थगनादेश दिला आहे

‘रंगोली’प्रकरणी न्यायालयाचा स्थगनादेश
बुधवारी पोहोचला आदेश : अतिक्रमण निर्मूलनाला तूर्तास लगाम
अमरावती : स्थानिक कठोरा मार्गावर असलेल्या रंगोली लॉन, मंगल कार्यालयाचे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या ‘डेड लाईन’वर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी स्थगनादेश दिला आहे. त्यामुळे ‘रंगोली’चे अतिक्रमण हटविण्यास तूर्तास लगाम लागल्याचे चित्र आहे.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार गत आठवड्यात सहायक संचालक नगर रचना विभागाच्या अभियंता चमुने रंगोली लॉन व मंगल कार्यालयाची मोजणी करुन अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता. पाच हजार चौरस फूट अतिरिक्त बांधकामासह काही भाग अतिक्रमित असल्याचे या अहवालात म्हटले होते. अहवालाच्या आधारावर आयुक्त गुडेवारांनी रंगोली मंगल कार्यालयाचे अतिक्रमण पाडण्याची नोटिस बजावली होती. त्यानुसार रविवारी महापालिकेची चमू रंगोली मंगल कार्यालयात पोहोचली असता आयुक्तांंच्या आदेशानुसार हे अतिक्रमण बुधवारी हटविण्याचे ठरविले.