केएनके कंपनीच्या संचालकाला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:29+5:302021-01-23T04:12:29+5:30
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये करण्यात आलेल्या कर्मचारी भरती प्रकरणात अचलपूर पोलिसांनी नोकरभरती प्रक्रिया राबविणाऱ्या केएनके ...

केएनके कंपनीच्या संचालकाला न्यायालयीन कोठडी
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये करण्यात आलेल्या कर्मचारी भरती प्रकरणात अचलपूर पोलिसांनी नोकरभरती प्रक्रिया राबविणाऱ्या केएनके टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकाला दवाखान्यातून सुटी होताच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दुसरीकडे या आरोपींनी संगनमताने कट रचून अवैध कृत्य केल्याची कलम १२० ब चौकशीअंती पोलिसांनी वाढविल्याने संगनमताने सर्व प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
केएनके कंपनीच्या संचालकाला अचलपूर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करण्यापूर्वी योगेश महादेव खंडारे (३७, रा. साईनगर अमरावती) याची प्रकृती योग्य नसल्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालय व तेथून अमरावती येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दवाखान्यातून सुटी झाल्यानंतर त्याची व २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असलेला त्याचा साथीदार संचालक गौरव नारायण वैद्य (२७, रा. गणेशनगर, परतवाडा) या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
-------------
संगनमताने कट रचून गैरव्यवहार
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरभरती करताना आरोपींनी संगनमताने कट रचून अवैध कृत्य केल्याची १२० ब कलम नव्याने अगोदर केलेल्या गुन्ह्यात वाढविण्यात आली. एक महिन्यापासून संचालक बाजार समितीमधील कर्मचारी व नोकरभरती करणाऱ्या संचालकांची चौकशी करून बयान नोंदविण्यात आले होते. दुसरीकडे सहायक सचिव मंगेश सुभाष भेटाळू व शिपाई शैलेश शुक्ला पसार आहेत.