गुजरातहून आलेल्या जोडप्याने आजारी वृद्धेला सोडले रस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:15+5:302021-04-08T04:13:15+5:30
अमरावती : कोरोना संक्रमणाच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावला. अशाच विवंचनेत गुजरात राज्यातून आलेल्या एका जोडप्याने त्यांच्या समवेत असलेल्या आजारी ...

गुजरातहून आलेल्या जोडप्याने आजारी वृद्धेला सोडले रस्त्यात
अमरावती : कोरोना संक्रमणाच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावला. अशाच विवंचनेत गुजरात राज्यातून आलेल्या एका जोडप्याने त्यांच्या समवेत असलेल्या आजारी वृद्धेला रस्त्यात सोडून दिले. याची माहिती मिळताच महापालिकेचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी सदर वृद्ध्रेला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकृतीत सुधार आल्यानंतर तिला महापालिकेच्या सेल्टर होममध्ये आसरा देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कोरोना संक्रमणाच्या काळात अनेक ठिकाणी लोक जेवणाची व्यवस्था करण्याकरिता भटकत आहेत. त्याचसोबत आपला उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत असताना गुजरातहून आलेल्या एका जोडप्यातील आजारी महिलेला रस्त्यात सोडण्यात आले. ही बाब रस्त्याने जात असलेल्या बबलू शेखावत यांच्या निदर्शनास आली. तात्काळ सर्वत्र फोन करून चौकशी केली. मात्र, योग्य प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांना कळविले व व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत व फोन करून चर्चा केली आणि अर्धा तासात ॲम्बुलंन्स व नाईट शेल्टर कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. शेल्टरच्या कर्मचाऱ्यांनी महिलेची विचारपूस केली. आजारी वृद्ध महिलेला सेल्टरमध्ये ठेवणे योग्य नसल्याने शेखावत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला उपचारार्थ दाखल केले. उर्वी शाह यांनी या महिलेविषयीची माहिती दिल्याचे शेखावत म्हणाले.