देशाचे लोकनेते होते रा.सू.गवई
By Admin | Updated: July 26, 2016 00:29 IST2016-07-26T00:29:16+5:302016-07-26T00:29:16+5:30
माजी राज्यपाल दिवंगत नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे.

देशाचे लोकनेते होते रा.सू.गवई
प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन : स्मारक, संकुलाचे भूमिपूजन
अमरावती: माजी राज्यपाल दिवंगत नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका दादासाहेबांनी अखेरपर्यत जोपासली. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने देशाचे लोकनेते होते, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
विद्यापीठाच्या श्रोतूगृहात रा. सू. गवई यांच्या स्मारक संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर कमलताई गवई, न्यायमूर्ती भूषण गवई, महापौर चरणजितकौर नंदा, आ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. अनिल बोंडे, आ. रवि राणा, कुलगुरु मुरलीधर चांदेकर, राजेंद्र गवई, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंत पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना.पोटे म्हणाले, दादासाहेबांनी गरीब, शोषित, पीडितांना न्याय कसा मिळेल? त्यांचे प्रश्न कसे सोडविता येईल, यासाठी उभे आयुष्य वेचले आहे. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनुसार स्मारकाला मूर्तरुप मिळाले आहे.