ग्रा.पं.च्या १८४ सदस्य पदांसाठी आज मतमोजणी

By Admin | Updated: July 27, 2015 00:25 IST2015-07-27T00:25:41+5:302015-07-27T00:25:41+5:30

जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ३० ग्रामपंनिवडणुकांमध्ये १८४ सदस्य पदांसाठी शनिवारी ७३.८६ टक्के मतदान झाले.

Counting of votes today for 184 member posts of Gram Panchayat | ग्रा.पं.च्या १८४ सदस्य पदांसाठी आज मतमोजणी

ग्रा.पं.च्या १८४ सदस्य पदांसाठी आज मतमोजणी

७४ टक्के मतदान : २१ हजार ९५४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
अमरावती : जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ३० ग्रामपंनिवडणुकांमध्ये १८४ सदस्य पदांसाठी शनिवारी ७३.८६ टक्के मतदान झाले. यामध्ये १० हजार ३५९ स्त्री व ११ हजार ५९५ पुरुष अशा एकूण २१ हजार ९५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजण सोमवार २७ जुलै रोजी होणार आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील शिरपूर ग्रामपंचायत अविरोध निवडून आली आहे. चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा, काकाझरी व अढाव या ग्रामपंचायतींमध्ये दाखल उमेदवारी अर्जाला जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्यामुळे सर्व अर्ज रद्द झाले होत. तसेच पोटनिवडणुकीची ४८ सदस्यपदांसाठी एकही अर्ज सादर न झाल्याने या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनात एप्रिल व जुलै या दोन टप्प्यांत जवळपास ६०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका कुठलीही तक्रार व गालबोट न लागता सुरळीत पार पडल्यात. शनिवारी सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत सकाळी ७.३० ते सायंकाळी ९.३० या वेळात अचलपूर तालुक्यात ६५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती ४२८, अंजनगाव सुर्जी ११३१, भातकुली ३१०७, चांदूरबाजार ४१०, चांदूररेल्वे ८३७, चिखलदरा १६६६, दर्यापूर १३१५, धामणगाव १३२१, धारणी ३३०५, मोर्शी १९१, नांदगाव खंडेश्वर ६२४९, तिवसा ८०० व वरुड तालुक्यात ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ७३.८६ आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Counting of votes today for 184 member posts of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.