कापूस उत्पादनात २५ टक्के घट !
By Admin | Updated: August 25, 2014 23:41 IST2014-08-25T23:41:50+5:302014-08-25T23:41:50+5:30
पावसाअभावी खुंटलेली वाढ व रोगट हवामानामुळे उभे ठाकलेले रोग व किडीचे संकट लक्षात घेता कपाशीपासून आगामी काळात चांगले उत्पादन मिळण्याची आशा आतापासूनच धुसर झाल्याने शेतकऱ्यांच्या

कापूस उत्पादनात २५ टक्के घट !
अमरावती : पावसाअभावी खुंटलेली वाढ व रोगट हवामानामुळे उभे ठाकलेले रोग व किडीचे संकट लक्षात घेता कपाशीपासून आगामी काळात चांगले उत्पादन मिळण्याची आशा आतापासूनच धुसर झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान प्रतिकूल परिस्थितीमुळे कापूस उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संरक्षित पाण्याची सोय असलेल्या जवळपास १० ते १५ टक्के शेतकरी मे महिन्यातच पूर्व हंगामी कपाशीची लागवड करतात. मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांनी यंदाही विहीरी व ट्यूबवेलच्या पाण्यावर पूर्व हंगामी कपाशीची लागवड केली. त्यातुलनेत दुुष्काळाचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड कमी प्रमाणात केलेली आहे. सद्या जिरायती कपाशी लागवडीला बऱ्यापैकी चालना मिळाली असली तरीही विदर्भात उशिरापर्यंत ३१ जुलै पर्यंत कपाशीची लागवड केल्या जाते. पावसाअभावी यंदा बऱ्याच भागात कपाशीची लागवड होऊ शकली नाही. काही भागात कपाशीची लागवड झाली असून कोवळे पीक कोमजून गेले. अशा विपरित परिस्थितीत कपाशीने सरासरी क्षेत्र गाठत सुमारे ३१ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.
पूर्व हंगामी कपाशीकडे चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने पाहिले जाते. प्रत्यक्षात मर रोगाचा प्रादुर्भाव, रोगट हवामानामुळे पांढरी माशी व रस शोषणाऱ्या किडीने घातलेल्या थैमानामुळे पूर्व हंगामी कपाशीपासून पहिल्या टप्प्यात अपेक्षित उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता बळावली आहे. महागडी औषधे फवारणी करुन ही कीड व रोग नियंत्रणात येत नसल्याचा शेतकऱ्यांना अनुभव आहे. उशिरा लागवड झाल्यामुळे चांगल्या पावसाची नक्षत्रे उलटून गेल्यानंतरही जिरायती पिकांची वाढ झाली नाही. आता पिकांची वाढ होण्याची शक्यता नाही. काहीत वाढ झाली नसताना जिरायती कपाशीपासून एकरी २ क्ंिवटलही कापूस मिळतो की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित होत आहे.