कापसाने भरलेला ट्रक उलटला
By Admin | Updated: April 15, 2015 00:16 IST2015-04-15T00:16:17+5:302015-04-15T00:16:17+5:30
रहाटगाव मार्गावरील हॉटेल गौरी इनजवळ सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कापसाच्या गाठिंनी भरलेला..

कापसाने भरलेला ट्रक उलटला
अमरावती : रहाटगाव मार्गावरील हॉटेल गौरी इनजवळ सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कापसाच्या गाठिंनी भरलेला ट्रक उलटल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. ट्रक एमपी-०९-एके-०९८७ अकोलावरून नागपूरकडे जात होता. दरम्यान रहाटगावजवळ ट्रकचा टायर फाटल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक मार्गाच्या खाली उलटला. या अपघातात ट्रक चालक फैयाज अब्दूल रहिम (३५,रा. अकोला) थोडक्यात बचावला. घटनेच्या माहितीवरुन गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.