शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
3
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
4
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
5
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
6
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
7
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
8
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
9
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
10
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
11
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
12
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
13
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
14
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
15
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
16
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी
17
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
18
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
19
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
20
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी

जिल्ह्यात कापूस कोंडी, भाजप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:01 IST

लेहेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर क्षमतेनुसार रोज ५०० क्विंटल म्हणजे २० ते २५ गाड्यांचीच मोजणी व खरेदी सुरू आहे. त्यामुळे ५ पेक्षा अधिक दिवस ट्रॅक्टर व अन्य वाहनांचे १५०० रुपयांप्रमाणे दरदिवसाचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. बैलजोडीला पाणी व चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्यांनाच करावी लागते. त्यामुळे कापूस विक्रीस लागलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक होत आहे.

ठळक मुद्देजिल्हाकचेरीवर धडक : खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी/अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत शेतकऱ्यांनसाठी ६ ठिकाणीच कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. अशातच तिवसा व चांदूर बाजार येथे खरेदी केंद्र सुरू नसल्याने लेहगाव येथील खरेदी केंद्रावर १८० गाड्या प्रतीक्षेत होत्या. परिणामी कमी केंद्र व दरदिवशी खरेदीची क्षमता याचा ताळमेळ नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. परिणामी कापूस खरेदी केंद्र वाढवावे, खरेदी केंद्रावरी गैरसोय टाळावी, टोकन पद्धत सुरू करावी, आठवडाभरात चुकारे करावे आदी मागण्यांसाठी शुक्रवारी माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.लेहेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर क्षमतेनुसार रोज ५०० क्विंटल म्हणजे २० ते २५ गाड्यांचीच मोजणी व खरेदी सुरू आहे. त्यामुळे ५ पेक्षा अधिक दिवस ट्रॅक्टर व अन्य वाहनांचे १५०० रुपयांप्रमाणे दरदिवसाचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. बैलजोडीला पाणी व चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्यांनाच करावी लागते. त्यामुळे कापूस विक्रीस लागलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक होत आहे. जिल्यातील कापूस उत्पादकांची गैरसोय थांबवावी आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन माजीमंत्री अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, ललित समदुरकर, दीपक अनासाने, विजय चिलात्रे, राजू कुरील, प्रवीण तायडे, बाळू मुरूकर, सचिन पाटील, सुहास ठाकरे, गोवर्धन सगणे, विलास ठाकरे, प्रदीप वडसे उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूसzpजिल्हा परिषद