खर्च सात हजार अन् मदत साडेचार हजार
By Admin | Updated: January 17, 2015 22:49 IST2015-01-17T22:49:45+5:302015-01-17T22:49:45+5:30
खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रात पीक घेण्यासाठी सात हजारांचा खर्च झाला. राज्य सरकारने मात्र फक्त साडेचार हजार रूपये मदत दिली. या तुटपुंज्या मदतीने शेतकरी कसा सावरणार, असा प्रश्न यानिमित्ताने

खर्च सात हजार अन् मदत साडेचार हजार
जितेंद्र दखने - अमरावती
खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रात पीक घेण्यासाठी सात हजारांचा खर्च झाला. राज्य सरकारने मात्र फक्त साडेचार हजार रूपये मदत दिली. या तुटपुंज्या मदतीने शेतकरी कसा सावरणार, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमी पावसामुळे धरणाची पातळी घटली असून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील १९८१ गावांमधील शेतकऱ्यांना १२५ कोटी लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे. ही रक्कम जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ४ हजार ५०० रूपये, बागायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी नऊ हजार रूपये व बहुवर्षीय फळपिकांखालील क्षेत्रासाठी १२ हजार रुपये आहे. ही रक्कम अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये पुरते निराशेचे वातावरण आहे.