विद्यापीठात ऑनलाईन बैठकांमुळे खर्चात बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:35+5:302021-01-08T04:37:35+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बहुतांश महत्त्वाच्या बैठकी, सभा मार्च २०२० पासून ऑनलाईन घेतल्या. परिणामी गत १० ...

विद्यापीठात ऑनलाईन बैठकांमुळे खर्चात बचत
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बहुतांश महत्त्वाच्या बैठकी, सभा मार्च २०२० पासून ऑनलाईन घेतल्या. परिणामी गत १० महिन्यांत विविध प्राधिकरणांची ३१ लाख ४६ हजार रुपयांची बचत झाली आहे. यात प्रवास भत्ता आणि मानधनाचा समावेश आहे.
राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन बैठकींना मनाई केली होती. त्यानुसार
विद्यापीठाने सिनेट, व्यवस्थापन परिषद, विद्वत परिषद, खरेदी समिती, वित्त व लेखा समिती, आयटी बोर्ड, एनएसएस, परीक्षा विभाग यांच्या विविध बैठकी ऑनलाईन घेतल्या. गेस्ट हाऊससुद्धा बंद आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या अतिथींवर होणारा खर्च थांबला आहे. यंदा ऑफिस, बैठकींसाठी केवळ ६ लाख ३३ हजार ११० रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. गतवर्षी प्रवास भत्ता, विद्यापीठाचे विविध प्राधिकरण,
कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी वृंद, विविध समित्या यावर ३१ लाख ४६ हजार ५९८ रुपये खर्च झाले होते,