अधिकार अभिलेखात चुका दुरुस्ती ढेपाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:32+5:302021-07-08T04:10:32+5:30
वरूड : शेतकऱ्यांच्या अधिकार अभिलेखामध्ये झालेल्या चुका महसूल प्रशानातील अधिकारी, तलाठी, कर्मचाऱ्यांकडून दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार ...

अधिकार अभिलेखात चुका दुरुस्ती ढेपाळली
वरूड : शेतकऱ्यांच्या अधिकार अभिलेखामध्ये झालेल्या चुका महसूल प्रशानातील अधिकारी, तलाठी, कर्मचाऱ्यांकडून दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा आदेशाने गरजेचा ठरतो. असते . शेतकरी किंवा तलाठी यांनी चुका दुरुस्त करण्याकरिता केलेल्या अर्जासोबत, अहवालासोबत सबळ महसुली पुरावे जोडूनसुद्धा अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. वरूड तहसील कार्यालयात अनेक प्रकरणे धूळखात पडली आहेत.
अहवाल किंवा अर्जासोबत सबळ महसुली पुरावे असतानासुद्धा अर्जदार शेतकऱ्याला तलाठ्याला सोबत आणा, असे सांगून अधिकारी वेळ मारून नेत असल्याची ओरड शेतकऱ्यांंमध्ये आहे. वरूड तहसील कार्यालयात अनेक महसुली अभिलेखात चूक दुरुस्तीची प्रकरणे धूळखात पडली असून, जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. खाबूगिरीसाठी अभिलेखात चूक दुरुस्तीचे प्रकरणे अडवून ठेवल्याची खमंग चर्चा आहे.