चांदूरबाजार येथे नगरसेवकाचे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:13+5:302021-03-16T04:14:13+5:30
घरकुलाकरिता अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता प्रस्ताव नगर परिषदेने अद्याप महसूल विभागाकडे न पाठविल्याने त्यांचे नाव घरकुल ...

चांदूरबाजार येथे नगरसेवकाचे अन्नत्याग आंदोलन
घरकुलाकरिता अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता प्रस्ताव नगर परिषदेने अद्याप महसूल विभागाकडे न पाठविल्याने त्यांचे नाव घरकुल यादीत समाविष्ट करणे शक्य नाही. त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अनेक गरजूंना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर १६७ लाभार्थ्यांच्या पुढील तिसऱ्या टप्प्याच्या अनुदान मागणीच्या प्रस्तावानुसार त्वरित निधी उपलब्ध करून देण्याकरिता तसेच प्रलंबित उर्वरित लाभार्थ्यांचा प्रस्ताव नगर परिषदेने त्वरित शासनाकडे पाठविण्याकरिता पालिकेला निर्देशित करावे, अशी मागणी तिरमारे यांनी केली. भाजप गटनेता मनीष नांगलिया, भाजप तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, नीलेश देशमुख, प्रणित खवले, रावसाहेब गुलक्षे, प्रदीप शर्मा, विजय शिवणकर, गजानन राऊत, अर्चना रुईकर, पूनम उसरबरसे, वंदना इंगळे, रुपाली भगत, सुषमा टवलारे, माधुरी साबळे इत्यादी उपस्थित होते.
पान २ साठी